कारागृहातील गैरप्रकार चव्हाट्यावर

By admin | Published: November 28, 2015 03:22 AM2015-11-28T03:22:34+5:302015-11-28T03:22:34+5:30

औरंगाबाद कारागृहातील गैरप्रकार माहितीच्या अधिकारातून उघड होणार होता. यामुळे माहिती अधिकार टाकणाऱ्या कर्मचाऱ्याची विभागाबाहेर बदली करण्यात आली.

Inmates of the prison | कारागृहातील गैरप्रकार चव्हाट्यावर

कारागृहातील गैरप्रकार चव्हाट्यावर

Next

बेमुदत उपोषण : शिपायाची विभागाबाहेर बदली
यवतमाळ : औरंगाबाद कारागृहातील गैरप्रकार माहितीच्या अधिकारातून उघड होणार होता. यामुळे
माहिती अधिकार टाकणाऱ्या कर्मचाऱ्याची विभागाबाहेर बदली करण्यात आली. याविरोधात कारागृहातील शिपायाने बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
सन २००८ मध्ये हजारी युवराजसिंह पद्मसिंह औरंगाबाद जेलमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. यावेळी त्यांनी माहिती अधिकारातून कारागृहातील अंतर्गत कामाबाबतची माहिती मागविली.
कारागृहातील कैद्यांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या सामनात मोठी हेराफेरी झाली. ही बाब माहिती अधिकारातून उघड होणार होती. यामुळे कारागृह प्रशासनाने त्यांच्याकडून बळजबरीने तोंडी लिहून घेतले. यानंतर त्यांची थेट विभागाबाहेर बदली करण्यात आली.
२४ जानेवारी २००९ ला अकोल्यात त्यांची बदली झाली. यानंतर त्यांनी आपसी बदलीची विनंती करीत औरंगाबाद कारागृहाची मागणी केली. मात्र त्यांच्या विनंतीला धुडकावण्यात आले. याबाबत त्यांनी वरिष्ठ पातळीवर व्यथा मांडली. याच सुमारास त्यांची यवतमाळ कारागृहात बदली करण्यात आली.
बदली करण्यामागे भ्रष्ट चेहरा कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. बदलीचे मुळ कारण शोधून विनंती केलेल्या ठिकाणी बदली करण्याची मागणी कर्मचाऱ्याने केली आहे. या प्रकरणात न्याय न मिळता कारवाई झाली तरी उपोषण कायम ठेवणार असल्याचे हजारी युवराजसिंह पद्मसिंह यांनी स्पष्ट केले आहे.
(शहर वार्ताहर)

Web Title: Inmates of the prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.