विहिरीतील गाळ उपसून गुरुदेव युवा संघाने केला प्रशासनाचा अभिनव निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:38 PM2018-03-06T23:38:02+5:302018-03-06T23:38:02+5:30

शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना उपाययोजना प्रस्तावावरच अडकल्या आहे.

Innovation of the administration by the absence of the waste of the well was done by Gurudev Youth Congress | विहिरीतील गाळ उपसून गुरुदेव युवा संघाने केला प्रशासनाचा अभिनव निषेध

विहिरीतील गाळ उपसून गुरुदेव युवा संघाने केला प्रशासनाचा अभिनव निषेध

Next

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना उपाययोजना प्रस्तावावरच अडकल्या आहे. विहिरीतील गाळ उपसून त्या उपयोगात आणण्यासाठी तयार करण्यात आलेला प्रस्ताव नगर विकास अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केला. या बाबीचा निषेध नोंदवित, काळे झेंडे दाखवून गुरुदेव युवा संघाने सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसणे सुरू केले. येथील जुनी धर्मशाळा परिसरातील विहिरीवरून याची सुरुवात करण्यात आली.
शहरातील सार्वजनिक विहिरीतील गाळाचा उपसा, ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे शुद्धीकरण, सबमर्सिबल पंप बसवून पाणीप्रश्न निवारणासाठी गुरुदेव युवा संघाने वारंवार निवेदन दिले. दरम्यान, नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाने तसा प्रस्ताव तयार करून नगर विकास अधिकाºयांकडे पाठविला. याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे जेसीबी लाऊन गुरुदेव युवा सेवा मंडळाने गाळाचा उपसा सुरू केला.
गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्या नेतृत्त्वात सार्वजनिक विहिरीजवळ निदर्शने करण्यात आली. याचा प्रशासनावर काहीही फरक न झाल्याने काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा निषेध करत सार्वजनिक विहिरींच्या साफसफाईचे काम सुरू करण्यात आले. यावेळी मनोज गेडाम यांच्यासह सचिव हिम्मतराव मुंदेकर, कोषाध्यक्ष प्रकाश कडुकार, अशोक माहुरकर, लक्ष्मण पोहकार, सुभाष जगताप, श्रीकृष्ण काठगळे, पंजाबराव देशमुख, संजय शेटे आदी उपस्थित होते. दरम्यान, मनोज गेडाम यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन यवतमाळ शहरातील पाणी उपलब्ध असलेल्या ५० ते ६० सार्वजनिक विहिरींची यादी सादर केली. नेहरू उद्यान, शिवाजी उद्यान, सत्यनारायण ले-आऊट, पोबारू ले-आऊट या भागातील विहिरीवरून पाण्याचे टँकर भरले जात होते. आता हे स्रोतही आटले आहे. त्यामुळे गाळाने भरलेल्या विहिरी उपसून शहरवासीयांची तहान भागविणे गरजेचे आहे, असे गेडाम यांनी सांगितले.

Web Title: Innovation of the administration by the absence of the waste of the well was done by Gurudev Youth Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.