जलयुक्तच्या कामांची चौकशी करा
By admin | Published: May 7, 2017 12:58 AM2017-05-07T00:58:25+5:302017-05-07T00:58:25+5:30
येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जलयुक्त शिवार योजनेंतर्गत अर्धवट असलेल्या कामांची चौकशी करावी,
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ग्राहक संरक्षण व लहुजी शक्ती सेनेचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जलयुक्त शिवार योजनेंतर्गत अर्धवट असलेल्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी एका निवेदनातून ग्राहक संरक्षण संस्था आणि लहुजी शक्ती सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
शासनाकडून जलयुक्त शिवारअंतर्गत विविध कामे करण्यात आली. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाने तालुक्यातील अनेक गावात जलयुक्त शिवारची कामे केली. परंतु अनेक कामे निकृष्ट दर्जाची आहे. हर्षी दहीवड शिवारात बांधलेला बंधारा एका पावसातच वाहून गेला. तसेच अनेक कामे अर्धवट आहे. या कामांची पाहणी ग्राहक संरक्षण संस्थेचे प्रदेश महासचिव सुरेश सिडाम मारोतराव आगोसे, गजानन जाधव, मधुकर वाळुकर, देवानंद निळकंठे यांनी केली. त्यावेळी सदर कामांचा दर्जा उघडकीस आला. या कामांची चित्रफीत तयार करून जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षकांना देण्यात आली आहे. या सर्व कामांची चौकशी करावी, अशी मगणी करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.