प्रसूत महिलांच्या इन्फेक्शनची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 09:55 PM2019-05-13T21:55:13+5:302019-05-13T21:55:30+5:30

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसुती विभागात एकाच वेळी डझनावर महिलांना शस्त्रक्रियेच्या जागी इन्फेक्शन झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती पीडित महिलांचे बयाण घेऊन शासनाकडे अहवाल पाठवणार आहे.

Inquiry of Leprosy Women's Infection | प्रसूत महिलांच्या इन्फेक्शनची चौकशी

प्रसूत महिलांच्या इन्फेक्शनची चौकशी

Next
ठळक मुद्दे‘मेडिकल’ : सहा सदस्यीय समिती देणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसुती विभागात एकाच वेळी डझनावर महिलांना शस्त्रक्रियेच्या जागी इन्फेक्शन झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती पीडित महिलांचे बयाण घेऊन शासनाकडे अहवाल पाठवणार आहे.
प्रसुती विभागात चौदापेक्षा अधिक महिलांना शस्त्रक्रियेच्या जागेत इन्फेक्शन झाले आहे. याची शासनस्तरावरून चौकशी लावण्यात आली आहे. त्यासाठी प्रभारी अधिष्ठाता डॉ. संजय भारती यांनी बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. दामोदर पटवर्धन यांच्या अध्यक्षतेत समिती तयार केली. यामध्ये शल्यचिकित्सक डॉ. विजय पोटे, मयाक्रो बॉयलॉजी विभागाचे डॉ. विवेक गुजर, स्त्रिरोग विभागाचे शस्त्रक्रियागृह इन्चार्ज डॉ. बोडखे, मेट्रन जुगनाके यांचा समितीमध्ये समावेश आहे. ही समिती एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना कोणाच्या चुकीमुळे इन्फेक्शन झाले, याची चौकशी करणार आहे. त्याचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांकडे पाठविण्यात येणार आहे.

Web Title: Inquiry of Leprosy Women's Infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.