सौजना येथे ‘नरेगा’तील वृक्ष लागवडीची तपासणी
By admin | Published: September 15, 2015 05:17 AM2015-09-15T05:17:41+5:302015-09-15T05:17:41+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षलागवड योजना हाती घेण्यात आली आहे. पर्यावरणाचे
घारफळ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षलागवड योजना हाती घेण्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतअंतर्गत वृक्षलागवड केली जात आहे. या झाडांची निगा योग्यरित्या राखली जात आहे की नाही, या दृष्टीने अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.
बाभूळगाव तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी ही योजना राबविली. मात्र काही ग्रामपंचायतअंतर्गत रोपांचे संगोपन होत नसल्याने त्याची वाढ खुंटली आहे. यात प्रशासनाचा निधी व्यर्थ जात आहे. ही बाब टाळली जावी, यासाठी यवतमाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष मानकर, विस्तार अधिकारी जीवन खाडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अर्चना गेडाम, बाभूळगाव पंचायत समितीचे कृषी तज्ज्ञ प्रदीप थोरात, माजी सरपंच बबन बोबले यांनी सौजना या गावातील झाडांची पाहणी केली.
वर्धा नदीतीरावर गुलमोहर, चाफा, बदाम, चेरी, आंबा, चिकू, चिंच, कडुनिंब, सोनचाफा आदी प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याची पाहणी सदर अधिकाऱ्यांनी केली. (वार्ताहर)