‘मिशन चक्रवती’ची केंद्रीय पथकाकडून पाहणी

By Admin | Published: June 4, 2016 02:10 AM2016-06-04T02:10:58+5:302016-06-04T02:10:58+5:30

लोकसहभागातून होत असलेल्या ‘मिशन चक्रवती’च्या कामाची पाहणी शुक्रवारी केंद्रीय पथकाने केली. प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या

Inspector of 'Mission Chakraborty' from Central team | ‘मिशन चक्रवती’ची केंद्रीय पथकाकडून पाहणी

‘मिशन चक्रवती’ची केंद्रीय पथकाकडून पाहणी

googlenewsNext

लोकसहभागाचे कौतुक : चापर्डा गावातील प्रश्न जाणले, नागरिकांनी मांडल्या पथकाकडे विविध समस्या
कळंब : लोकसहभागातून होत असलेल्या ‘मिशन चक्रवती’च्या कामाची पाहणी शुक्रवारी केंद्रीय पथकाने केली. प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या आणि होणाऱ्या कामाची माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या कामाची माहिती देण्यात येईल, असा विश्वासही या पथकाने दिला.
दिल्ली येथील नीती आयोगाचे सदस्य तथा पथक प्रमुख रामानंद, ग्रामीण विकास विभागाचे अव्वर सचिव राम वर्मा, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे सचिव जे.के. राठोड, जलसंधारण विभागाचे उपसंचालक मिलिंद पानपाटील, भारतीय खाद्य निगमचे सहायक प्रबंधक एम.एम. बोऱ्हाडे, मदत व पुनर्वसन उपसचिव आत्राम यांच्यासह वरिष्ठ मंडळी यावेळी उपस्थित होती. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार ंयांनी लोकसहभागातून केलेल्या या कामाची माहिती पथकाला दिली.
चक्रवती नदीचे पात्र अरुंद व उथळ असल्याने पाणी साचत नव्हते. भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागायचा. आता नदी खोल करण्यात आली, पात्र रुंद करण्यात आले. ठिकठिकाणी भूमिगत बंधारे निर्माण करून पाणी साठवण क्षमता वाढविण्यात आली. येणाऱ्या काही वर्षात कळंब शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पथक प्रमुख रामानंद यांनी हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर टाकण्यात येणार असल्याचे सांगितले.
पथकाची चापर्डा गावाला भेट
केंद्रीय पथकाने शुक्रवारी चापर्डा गावला भेट दिली. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोणती पिके घेतली जातात, पीक होते की नाही, शेतीमध्ये लावलेला पैसा निघतो की नाही याची माहिती पथकाने घेतली. नागरिकांनी आपले प्रश्न मांडले. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, तहसीलदार संजय होटे, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे, तालुका कृषी अधिकारी के.बी. आठवले, पशुधन विकास अधिकारी रवींद्र मांडेकर, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, पंकज बरडे आदी उपस्थित होते. कामठवाडा गावलाही पथकाची भेट नियोजित होती. गावकरी सकाळपासूनच वाट पाहात होते. ऐनवेळी पथकाने उशीर झाल्याचे कारण देत कामठवाडा गावला जाण्याचे टाळले. त्यामुळे तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Inspector of 'Mission Chakraborty' from Central team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.