इसापूर, सिंगद रोपवाटिकेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:14 PM2019-07-21T22:14:44+5:302019-07-21T22:15:05+5:30

यवतमाळ येथे नव्यानेच रुजू झालेले वनसंरक्षक रवींद्र वानखडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच दिग्रस वनपरिक्षेत्राला भेट दिली. त्यांनी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेचा भवानी टेकडी येथे वृक्षलागवड करून प्रारंभ केला.

Inspiration of Isapur, Singer Nursery | इसापूर, सिंगद रोपवाटिकेची पाहणी

इसापूर, सिंगद रोपवाटिकेची पाहणी

Next
ठळक मुद्देमुख्य वनसंरक्षकांची भेट : भवानी टेकडी परिसरात केले वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : यवतमाळ येथे नव्यानेच रुजू झालेले वनसंरक्षक रवींद्र वानखडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच दिग्रस वनपरिक्षेत्राला भेट दिली. त्यांनी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेचा भवानी टेकडी येथे वृक्षलागवड करून प्रारंभ केला.
वनसंरक्षक वानखडे यांनी भवानी टेकडी येथील नक्षत्रवन, पंचवटीवन, बाल उद्यान, फुलपाखरू बगीचा, बांबू रोपवन, दत्तापूर रोपवाटिकेची पाहणी केली. गांडूळ निर्मिती, औषधी वनस्पती व येथे आढळणाऱ्या विविध प्रजाती व औषधी वनस्पती एकाच ठिकाणी लागवड करण्याचा सूचना दिल्या. भवानी टेकडी निसर्ग पर्यटनस्थळी शाळकरी मुलांना आणून त्यांना वृक्ष, निसर्ग, वन्यप्राण्यांबाबत माहिती देण्यास सांगितले.
वानखडे यांनी दिग्रस वनपरिक्षेत्रातील रूई, भिलवाडी येथील वृक्षलागवडीची पाहणी केली. वृक्षलागवड कशी करावी, याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले. मध्यवर्ती रोपवाटिक सिंगद येथील आधुनिक व उच्च तंत्रज्ञानयुक्त रोपवाटिकेलाही त्यांनी भेट दिली. तेथील रोपनिर्मिती व विविध रोपवनात यावर्षी जवळपास तीन लाख रोपे व इतर यंत्रणांना पाठविण्यात येणाऱ्या रोपांची माहिती घेतली. वानखडे यांनी वनपरिक्षेत्रातील विविध कामांची वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद धोत्रे यांच्याकडून माहिती घेतली. उत्कृष्ट कामाबद्दलत्यांनी दिग्रस वनपरिक्षेत्रातल कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्यांच्यासोबत पुसदचे उपवन संरक्षक अरविंद मुंढे होते.

Web Title: Inspiration of Isapur, Singer Nursery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.