पाढुर्णा येथे प्रेरणादायी उपक्रमाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:42 AM2021-07-31T04:42:16+5:302021-07-31T04:42:16+5:30
लाडखेड : दारव्हा तालुक्यातील पाढुर्णा (आदर्श) ग्रामपंचायतीने सरपंच रत्नदीप यादव पवार यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम सुरू केले आहेत. हे ...
लाडखेड : दारव्हा तालुक्यातील पाढुर्णा (आदर्श) ग्रामपंचायतीने सरपंच रत्नदीप यादव पवार यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम सुरू केले आहेत. हे उपक्रम इतर ग्रामपंचायतींना प्रेरणादायी ठरत आहे.
गावात ‘माझी कन्या चंदन कन्या’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात जन्मतः मुलीपासून तर पाच वर्षांपर्यंतच्या मुली ज्या घरात आहे, त्यांना चंदनाचे रोपटे देऊन वृक्षारोपण करून घेण्यास सुरुवात केली आहे. यात झाडे लावण्यासोबतच पालकांच्या मनात मुलींबद्दल एक सन्मान निर्माण होत आहे.
पहिल्या टप्प्यात ७० मुलींना चंदनाचे रोपटे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यातून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या उपक्रमाला चालना मिळणार आहे. उच्चशिक्षित सरपंच रत्नदीप पवार यांनी बुधवारी चंदनाचे रोपटे देऊन या उपक्रमाला सुरुवात केली. यापुढेही नवनवीन संकल्पना राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.