कोविड रुग्णालयात सीसीटीव्ही लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:38 AM2021-05-01T04:38:31+5:302021-05-01T04:38:31+5:30
पुसद : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डॉक्टर व रुग्ण यांच्यात अधिक विश्वास निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी ...
पुसद : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डॉक्टर व रुग्ण यांच्यात अधिक विश्वास निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी कोविड रुग्णालये व अतिदक्षता विभागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे.
राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. रुग्णाला उपचारासाठी दाखल केल्यानंतर तो पूर्णपणे रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात असतो. त्याच्यावरील उपचारांबाबत कुटुंबीय अनभिज्ञ व अंधारात असते. काही रुग्णालयांंमध्ये भरमसाठ रक्कम उपचारांआधीच आगाऊ मागितली केली जाते. उपचारांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी आहे. प्रशासनाकडे अशा तक्रारी पाठविण्यात आल्या आहे.
अनेकदा तक्रारी डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्यामधील पुरेशा विश्वासाच्या अभावतूनही केल्या जातात.
काही वेळा उपचारांदरम्यान रुग्ण दगावल्यास नातेवाईक हिंसक होतात. वाद होऊन त्याचे पर्यवसान तोडफोडीत होते. अशा घटना डॉक्टर व समाजासाठी हानिकारक आहेत. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून किमान कोविड रुग्णालयात रुग्णावर ज्या कक्षात उपचार केले जातात त्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, अशी मागणी आहे. सीसीटीव्ही लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रुग्णालयाने अनिवार्यपणे करावी, असे आदेश शासनाने द्यावे, अशी मागणी जिल्हा ग्राहक पंचायतने केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रा. नारायण मेहरे, जिल्हा संघटक हितेश सेठ, सचिव डॉ. केशव चेटूले, ॲड. राजेश पोहरे, शेखर बंड, राजेंद्र कठाळे, अनंता भिसे, ॲड. अनुपमा दाते, डॉ. एस. के. वर्मा, अश्विनी थोडगे, प्रा. राजेंद्र ठाकूर, प्रा. मतीनखान, विलास अमरावतकर, चंद्रकांत गड्डमवार, विपुल पोबारू, प्रकाश चनेवार, जिनेंद्र बंगाले, सुशील कोठारी, प्रा. सुरेश ढोके, डॉ. निवृत्ती पिस्तुलकर, आदींच्या स्वाक्षरी आहे.