मान्सूनपूर्व कामांना गती देण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 10:03 PM2020-05-20T22:03:03+5:302020-05-20T22:03:48+5:30

जिल्हाधिकारी एम.डी. सिंह म्हणाले, तालुका स्तरावरील समितीने त्वरीत मान्सुनपूर्व बैठकीचे आयोजन करावे. विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मरवर जी झाडे किंवा फांद्या येतात, त्या त्वरीत तोडाव्यात, जेणेकरून वीज पुरवठा खंडीत होणार नाही. सोबतच ग्रामीण व शहरी भागात ज्या रस्त्यांवर आवश्यकता आहे तेथे मुरूम टाकावा. आरोग्य विभागाने आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी, आदी सूचना त्यांनी केल्या.

Instructions for speeding up pre-monsoon works | मान्सूनपूर्व कामांना गती देण्याच्या सूचना

मान्सूनपूर्व कामांना गती देण्याच्या सूचना

Next
ठळक मुद्देआढावा बैठक : नाल्या स्वच्छ करा, वीज विषयक कामे हाती घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मान्सुनच्या काळात होणारी अतिवृष्टी, पूर परिस्थिती, अचानक येणारी आपत्ती आदीबाबत विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे मान्सुनपूर्व आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाचा मान्सुनपूर्व प्रगतीचा आढावा घेतला.
नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी एम.डी. सिंह म्हणाले, तालुका स्तरावरील समितीने त्वरीत मान्सुनपूर्व बैठकीचे आयोजन करावे. विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मरवर जी झाडे किंवा फांद्या येतात, त्या त्वरीत तोडाव्यात, जेणेकरून वीज पुरवठा खंडीत होणार नाही. सोबतच ग्रामीण व शहरी भागात ज्या रस्त्यांवर आवश्यकता आहे तेथे मुरूम टाकावा. आरोग्य विभागाने आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी, आदी सूचना त्यांनी केल्या.
बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीकांत देशपांडे, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रामटेके आदी उपस्थित होते.

बांधकाम विभागाने खड्डे बुजवावे - पोलीस अधीक्षक
जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार म्हणाले, अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थितीच्या दृष्टीने सर्वांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. विविध ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने जीवितहानी होऊ नये. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने असे खड्डे त्वरीत बुजवावे, प्रगतिपथावर असलेली कामे त्वरीत पूर्ण करावी.

Web Title: Instructions for speeding up pre-monsoon works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.