जिल्ह्यात ४७ हजार हेक्टरवरील पिकांना विम्याचे सुरक्षा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:57 PM2019-02-20T23:57:44+5:302019-02-20T23:58:34+5:30
यावर्षी जिल्ह्यात एक लाख ४४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. यातील केवळ ४७ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचे पीक विमा काढून सुरक्षित करण्यात आले. याकरिता ४९ हजार शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षी जिल्ह्यात एक लाख ४४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. यातील केवळ ४७ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचे पीक विमा काढून सुरक्षित करण्यात आले. याकरिता ४९ हजार शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी एक कोटी ७५ लाख ४४ हजार रूपयांचा विमा शेतकºयांनी उतरविला आहे.
अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी हरभऱ्याचा पेरा वाढविला. हा पेरा ९० हजार हेक्टरच्या जवळ पोहोचला आहे. तर ४५ हजार हेक्टरपर्यंत गव्हाची पेरणी करण्यात आली आहे.
गव्हाच्या क्षेत्राच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र यावर्षी सर्वाधिक आहे. पेरणी केलेल्या एकूण क्षेत्रापैकी ४७ हजार हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांनी विमा उतरवून सुरक्षित केले. यामुळे एक हजार १६९ कोटी ६४ लाख चार हजार ५७५ रूपयांचे पीक संरक्षित झाले. यावर्षी शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पिकाचा विमा मोठ्या प्रमाणात उतरविला आहे. तर गव्हाचे क्षेत्र मर्यादित आहे.
उन्हाळी भूईमुगाच्या पीक संरक्षणाकडे मात्र पाठ
रब्बीचा विमा उतरविण्यासाठी ४९ हजार शेतकरी पुढे आले. मात्र उन्हाळी भूईमुगाच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी पुढे येताना दिसत नाही. यामुळे उन्हाळी भूईमुगाचा विमा उतरविण्याचा आकडा किती हेक्टरपर्यंत पोहोचेल, याचे उत्तर येणाºया काळातच कळेल.