जप्तीतील ४०० ब्रास रेतीसाठ्याची परस्पर विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 09:45 PM2018-11-28T21:45:59+5:302018-11-28T21:47:08+5:30

तहसीलदारांनी जप्त केलेल्या रेती साठ्याचा महसुली प्रक्रियेद्वारे लिलाव न करता परस्पर दुप्पट दराने यवतमाळ तालुक्यात विक्री केली जात आहे. एका नायब तहसीलदाराने आक्रमक भूमिका घेत रेतीचे ट्रॅक्टर जप्तीची धडक कारवाई केल्याने या प्रकाराचा भंडाफोड झाला आहे.

Interception of 400 Brass Sandstorms in Jail | जप्तीतील ४०० ब्रास रेतीसाठ्याची परस्पर विक्री

जप्तीतील ४०० ब्रास रेतीसाठ्याची परस्पर विक्री

Next
ठळक मुद्देट्रॅक्टर जप्तीने भंडाफोड : लिलाव प्रक्रियेला बगल, आधी दंड मग दुप्पट दर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तहसीलदारांनी जप्त केलेल्या रेती साठ्याचा महसुली प्रक्रियेद्वारे लिलाव न करता परस्पर दुप्पट दराने यवतमाळ तालुक्यात विक्री केली जात आहे. एका नायब तहसीलदाराने आक्रमक भूमिका घेत रेतीचे ट्रॅक्टर जप्तीची धडक कारवाई केल्याने या प्रकाराचा भंडाफोड झाला आहे.
यवतमाळच्या तहसीलदारांनी नुकताच आपल्या कार्यक्षेत्रातील रेतीचा खुल्या जागेतील सर्व साठा जप्त केला. हा साठा ४०० ते ५०० ब्रास असल्याचे सांगितले जाते. बाजारात रेतीला प्रती ब्रास पाच ते सात हजार रुपये दर आकारला जातो. या बहुतांश बेवारस रेती साठ्याचा रितसर प्रक्रिया राबवून लिलाव करणे अपेक्षित होते. मात्र त्या प्रक्रियेत न जाता महसूल विभागाने ते साठे कुणाच्या तरी मालकीचे दाखवून त्यांना प्रति ब्रास अडीच हजार रुपये दंड ठोठावला. नंतर हीच रेती संबंधितांकडून पाच ते सात हजार रुपये प्रति ब्रास व १४ हजार रुपये ट्रक (दोन ब्रास) असा दर आकारुन सर्रास बांधकामांना विकली जात आहे. दरम्यान एका नायब तहसीलदाराने अवैध रेती विरोधात मोहीम उघडली. या मोहिमेत अनेक ट्रॅक्टर जप्त झाले. मात्र त्यातील रेतीला आधीच प्रति ब्रास अडीच हजार रुपये दंड ठोठावला गेला असताना पुन्हा जप्ती कशासाठी असा प्रश्न संबंधितांनी विचारला असता रेती साठ्याचा लिलाव न करता परस्पर विक्रीचे हे प्रकरण पुढे आले. जप्तीतील ट्रॅक्टर आजही तहसील कार्यालयात उभे आहेत. विशेष असे आधी जप्त रेती साठ्याची मालकी निष्पन्न झाली असेल तर त्यांनी ती रेती कोठून आणली, रॉयल्टी भरली काय याची शहानिशा केली गेली नसल्याचे सांगितले जाते.
तलाठी बनला रेती माफियांचा ‘मध्यस्थ’
अवैध रेती साठा जप्त करून त्याची परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणात एका तलाठ्याने महत्त्वाची भूमिका बजावली. नायब तहसीलदाराने रेतीचे ट्रॅक्टर जप्त केले तेव्हा हा तलाठी बाहेरगावी होता. ट्रॅक्टर- प्रति ब्रास अडीच हजार रुपये दंड भरलेल्या रेती मालकांनी त्याला संपर्क केला असता मी सुटीवरून येताच ‘अ‍ॅडजेस्ट’ करतो असे त्याने सांगितले. तो सुटीवरून आला मात्र अद्याप त्याला ‘अ‍ॅडजेस्टमेंट’मध्ये ‘यश’ आले नसल्याचे बोलले जाते. हा तलाठी यवतमाळच नव्हे तर लतगच्या राळेगाव, कळंब, आर्णी व अन्य तालुक्यातही अवैध रेती उत्खननात ‘मध्यस्थी’साठी नेहमीच पुढाकार घेत असल्याचे महसूल यंत्रणेत बोलले जाते.

Web Title: Interception of 400 Brass Sandstorms in Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.