ग्रामपंचायतीच्या कामात पंचायत समिती सदस्यांची ढवळाढवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:52 AM2021-09-16T04:52:45+5:302021-09-16T04:52:45+5:30
पंचायत समिती स्तरावर सदस्यांना कोणताही निधी प्राप्त होत नसल्याने त्यांची घुसमट होत आहे. त्यामुळे त्यांना ...
पंचायत समिती स्तरावर सदस्यांना कोणताही निधी प्राप्त होत नसल्याने त्यांची घुसमट होत आहे. त्यामुळे त्यांना निवडणुकीमध्ये जो खर्च झाला तो कुठून काढायचा, हा प्रश्न सतावत असतो. त्यामुळे या सदस्यांनी समाजकार्य सोडून पैसा कुठून मिळेल, यासाठी आता ग्रामपंचायतीला टार्गेट केले आहे. ग्रामपंचायतीच्या प्रत्येक विकासकामामध्ये तक्रार करायची व ठेकेदाराला टार्गेट करायचे. ज्यांनी पैसे दिली त्याची तक्रार मागे व ज्यांनी पैसे दिले नाहीत, त्यांची तक्रार, अशी मोहीमच या पंचायत समिती पदाधिकाऱ्याने राबविली आहे. या सर्व प्रकारामुळे मात्र ग्रामसेवकाला विकासकामे करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन अशा पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना आवर घालण्याची गरज आहे.