वऱ्हाडच्या बोली भाषेत आंतरिक गोडवा

By admin | Published: April 8, 2016 02:17 AM2016-04-08T02:17:33+5:302016-04-08T02:17:33+5:30

‘आपल्या विदर्भाची भाषा बोलायला पूर्वी लोकं घाबरत होते. त्यामुळे तिचा गंध बाहेरच्या लोकांना फारसा कळला नव्हता.

Internal sweetness in the language of Verdi's dialect | वऱ्हाडच्या बोली भाषेत आंतरिक गोडवा

वऱ्हाडच्या बोली भाषेत आंतरिक गोडवा

Next

भारत गणेशपुरे : ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमचा ‘लोकमत’शी दिलखुलास संवाद
अविनाश साबापुरे यवतमाळ
‘आपल्या विदर्भाची भाषा बोलायला पूर्वी लोकं घाबरत होते. त्यामुळे तिचा गंध बाहेरच्या लोकांना फारसा कळला नव्हता. पण आपण कुठंय गेलो का आपली भाषाच बोलतो. वऱ्हाडच्या भाषेत आंतरिक गोडवा आहे. विदर्भ, मराठवाडा, मुंबईच नाही तर मी जेव्हा परदेशात जातो, तं तिथंही आपली भाषा बोलतो. लोकायले आवडते थे...’ भाषेचा धागा धरूनच प्रसिद्ध सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांनी गुरूवारी ‘लोकमत’शी दिलखुलास गप्पा मारल्या.
समतापर्वात ‘चला हवा येऊ द्या’ हा मनोरंजक कार्यक्रम सादर करण्यासाठी भारत गणेशपुरे, भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके या हास्य अभिनेत्यांची टीम यवतमाळात गुरुवारी दाखल झाली. ‘लोकमत’शी बोलताना हे कलावंत म्हणाले, विदर्भाची भाषा चांगली असली, तरी तिच्यात नागपूर, चंद्रपूर अशा जिल्ह्यांमध्ये हिंदी मिसळली आहे. अमरावती, यवतमाळात हे प्रमाण कमी असले तरी हिंदीचा प्रभाव जाणवतोच. विदर्भातील कलारसिकतेविषयी ते म्हणाले, पुण्या-मुंबईपेक्षा विदर्भात नाटकं कमी होतात. हे खरे असले तरी त्याला इथली रसिकता कारणीभूत नाही. त्यामागे नाटकांचे अर्थकारण आहे. मुंबईतून कलावंतांची गाडी निघाली आणि इथे एकच शो झाला, तर कसे परवडणार? पण विदर्भातील कलावंतांची दाद देण्याची पद्धत भारी आहे. चंद्रपूर, चिखलदरा, चांदूररेल्वे येथे नुकतेच आम्ही नाटकं केले. तेव्हा हॉल फुल पॅक होता. विदर्भाच्या माणसाचं कसं असते, ३५ माणसं असनं तरी टाळ्या एवढ्या वाजवतात का हॉल हाउसफुल्ल असल्यासारखे वाटते. यवतमाळच्या रसिकांनी आमच्यावर प्रेम केलेच. यापुढेही करीत राहावे. या कलावंतांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये यवतमाळातील महिला आणि लहानग्यांनी गर्दी केली होती.
शोसाठी फिरत असताना हे कलावंत घरच्यांनाही ‘मिस’ करतात. पण त्याविषयी देखील ते विनोदाने बोलले, ‘‘बायकोचं कसं हाय. तिले पतीही पाहिजे अन् पैसाही पाहिजे. पण तसं कसं जमन? पैसा पाहिजे तं पतीले काम कराच लागन!’’ भारत गणेशपुरे यांच्या या वाक्याने अख्खी टिम खदखदून हसली.

Web Title: Internal sweetness in the language of Verdi's dialect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.