ट्रक चोरांचे आंतरजिल्हा रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:24 PM2018-07-18T22:24:15+5:302018-07-18T22:24:40+5:30

ट्रक चोरांची आंतरजिल्हा टोळी स्थानिक पोलिसांच्या निशाण्यावर आहे. पोलिसांचे हात या टोळीच्या अगदी जवळ पोहोचले असून या माध्यमातून १८ ते २० ट्रक जप्त करण्याची तयारी पोलिसांच्या स्तरावर सुरू आहे.

Interstate racket of truck thieves | ट्रक चोरांचे आंतरजिल्हा रॅकेट

ट्रक चोरांचे आंतरजिल्हा रॅकेट

Next
ठळक मुद्देपोलिसांचा वॉच : १८ ते २० ट्रक निशाण्यावर, चेचीस क्रमांकांचा गैरवापर

राजेश निस्ताने।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ट्रक चोरांची आंतरजिल्हा टोळी स्थानिक पोलिसांच्या निशाण्यावर आहे. पोलिसांचे हात या टोळीच्या अगदी जवळ पोहोचले असून या माध्यमातून १८ ते २० ट्रक जप्त करण्याची तयारी पोलिसांच्या स्तरावर सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात गेल्या सहा महिन्यांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे डिटेक्शन वाढले आहे. नवनवीन गुन्हे उघडकीस आणण्यावर एलसीबीचा भर आहे. या माध्यमातून एलसीबीची गतिमानता वाढली आहे. डिटेक्शनच्या याच साखळीतून पोलिसांनी चोरीतील ट्रकवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. सूत्रानुसार, यवतमाळ शहरात ट्रक चोरांचे एक रॅकेट सक्रिय आहे. त्याची व्याप्ती अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. या टोळीचे सदस्य यवतमाळातच नव्हे तर लगतच्या जिल्ह्यांमध्येही विखुरले गेले आहेत. ही टोळीच पोलिसांच्या निशाण्यावर आहे. या टोळीने चोरीतील व्यवहार केलेल्या ट्रकचे क्रमांक पोलिसांनी ट्रेस केले आहे. या क्रमांकाच्या माध्यमातूनच पोलिसांचे हात ट्रक चोरांच्या या टोळीतील सदस्यांच्या कॉलरपर्यंत पोहोचणार आहेत. बाहेरुन आलेले, भंगारात खरेदी केलेले ट्रक विकले गेले आहेत. त्यासाठी चेसीस नंबरचा गैरवापर केला गेला आहे. नंबर एका वाहनाचा आणि त्यावर पासिंग दुसऱ्याच वाहनाचे असे प्रकार घडले आहे. यापूर्वी पोलिसांनी २००८-०९ मध्ये अशा पॅटर्नवर चालणाºया टोळीचा पर्दाफाश करून १५ ते १६ चारचाकी वाहने जप्त केली होती. हे ट्रक आजूबाजूच्या जिल्ह्यात बोगस कागदपत्रांवर पासिंग झाल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. ट्रक चोरांची ही टोळी या व्यवसायातील दिग्गजांकडून आॅपरेट केली जात असल्याचे सांगितले जाते. ही टोळी हाती लागल्यास १८ ते २० ट्रक जप्त होऊ शकतात, असा दावा पोलीस दलातून केला जात आहे.
असे झाले होते बोगस पासिंग
जुन्या ट्रकवर एक ते दीड लाखांचा टॅक्स प्रलंबित होता. म्हणून पुसद विभागातील एका ड्रायव्हींग स्कूलच्या संचालकाने अवघ्या ३० हजारात हा ट्रक बोगस पद्धतीने पासिंग करून देण्याचा नवा फंडा शोधला. नवा क्रमांक मिळाल्याने ट्रकची किंमतही वाढली आणि जुना प्रलंबित कर भरण्याची गरजही पडली नाही. त्यासाठी बोगस रहिवासी दाखले, सही-शिक्के, स्टॅम्प वापरले गेले. या प्रकरणात सीआयडीने जिल्ह्यातून ड्रायव्हींग स्कूल संचालक, फायनान्स एजंट, प्रिंटींग प्रेस संचालक तसेच बारामती, अंबेजोगाई, नांदेड आदी भागातील आठ ट्रक चालक अशा डझनावर आरोपींना अटक केली. याच पद्धतीने सध्याही ट्रक चोरी व बोगस पासिंगचा धंदा अन्य जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयांमध्ये सुरू असण्याचा संशय पोलिसांना आहे.

१२ वर्षांपासून सीआयडी तपास सुरूच!
यवतमाळच्या डेप्युटी आरटीओ कार्यालयात २००६-०७ मध्ये ३८ ट्रकच्या बोगस पासिंगचा घोटाळा उघडकीस आला होता. हा घोटाळा सखोल तपासासाठी त्याचवेळी यवतमाळ सीआयडीला (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) सोपविण्यात आला होता. परंतु गेल्या १२ वर्षांपासून हा तपास सुरूच आहे. अर्धा डझनापेक्षा अधिक तपास अधिकारी बदलूनही या प्रकरणात सीआयडीला अद्याप दोषारोपपत्र सादर करता आलेले नाही. मध्यंतरी हा तपास सीआयडीच्या अमरावती पथकाकडे देण्यात आला होता. मात्र काही महिने तेथे प्रलंबित राहून पुन्हा तो यवतमाळला परत पाठविला गेला.

Web Title: Interstate racket of truck thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.