शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:33 PM2018-08-10T22:33:26+5:302018-08-10T22:34:05+5:30

बिटीची लागवड करायची की नाही, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. शुद्ध बियाणे मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच कीटकनाशक फवारणीचे प्रमाण कमी होईल, असे मत माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.

Introduce new technologies to farmers | शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान पोहोचवा

शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान पोहोचवा

Next
ठळक मुद्देनाना पटोले : यवतमाळात ‘कपाशीचा चक्रव्यूह’ परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बिटीची लागवड करायची की नाही, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. शुद्ध बियाणे मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच कीटकनाशक फवारणीचे प्रमाण कमी होईल, असे मत माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.
‘कपाशीचा चक्रव्यूह’ या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. नागपूर येथील केंद्रीय कापूस अनुसंधान संस्था व शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीच्या संयुक्त विद्यमाने कापूसतज्ज्ञांची ही परिषद शुक्रवारी येथे पार पडली.
अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार होते. मार्गदर्शक म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, कापूस अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. व्ही. एन. वाघमारे, पॅन इंडियाचे संचालक डॉ. डी. नरसिम्हा रेड्डी, डॉ. व्ही. एस. नगरारे, बसवेश्वर घोडकी, डॉ. शालीग्राम वानखडे, टी. व्ही. कठाणे, केरळचे संशोधक दिलीप कुमार, प्रा. मिलिंद राऊत, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, शैलेश पांडे यांची उपस्थिती होती. याशिवाय माजी आमदार विजयाताई धोटे, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केले.
दिवंगत प्रगतीशील शेतकरी मेहंदीसेठ गिलानी यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: Introduce new technologies to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.