अवैध सावकाराच्या ज्वेलर्स, घरावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 09:51 PM2018-02-28T21:51:40+5:302018-02-28T21:51:40+5:30

महिलेने गहाण ठेवलेले दागिने पैसे देऊनही परत करण्यास नकार देणाऱ्या येथील अवैध सावकाराच्या ज्वेलर्स व घरावर सहकार विभागाने मंगळवारी धाड टाकली.या धाडीत २० प्रकारची संशयास्पद कागदपत्रे आढळून आली.

Invalid lobbying jewelers, forage at home | अवैध सावकाराच्या ज्वेलर्स, घरावर धाड

अवैध सावकाराच्या ज्वेलर्स, घरावर धाड

Next
ठळक मुद्देउमरखेड येथे कारवाई : २० कागदपत्रे, दस्तावेज जप्त

ऑनलाईन लोकमत
उमरखेड : महिलेने गहाण ठेवलेले दागिने पैसे देऊनही परत करण्यास नकार देणाऱ्या येथील अवैध सावकाराच्या ज्वेलर्स व घरावर सहकार विभागाने मंगळवारी धाड टाकली.या धाडीत २० प्रकारची संशयास्पद कागदपत्रे आढळून आली.
सागर सुभाष आधापुरे व स्वप्नील सुभाष आधापुरे असे अवैध सावकारांचे नाव आहे. त्यांचे शहरात तुळजाई ज्वेलर्स आहे. उमरखेड येथीलच सुनंदा प्रकाश वानखेडे यांनी पैशाची अडचण असल्याने २ मे २०१५ रोजी आधापुरे यांच्याकडे सोने गहाण ठेऊन ३० हजार रुपये उचलले होते.
काही दिवसानंतर सुनंदाने सावकाराला २० हजार रुपये व्याज दिले. त्यानंतर काही दिवसांनी दागिने परत मागितले. त्यावेळी ६९ हजार ६०० रुपयांची मागणी केली. वारंवार मागणी करूनही दागिने दिले नाही. त्यामुळे सुनंदाने सावकाराचे सहायक निबंधकाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून सोमवारी धाड टाकण्यात आली. यावेळी २० प्रकारची संशयास्पद कागदपत्रे आढळून आली. ती ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई सहायक निबंधक एस.एस. भालेराव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
यवतमाळातही धाड
यवतमाळ येथील ओम कॉलनीतील विनोद लक्ष्मण राय या अवैध सावकारावर सहकार विभागाने धाड टाकली. त्यांच्या घरुन प्लॉट, शेतजमीन खरेदी, कोरे चेक, वाहनांची कागदपत्रे, कोरे स्टॅम्प असे २२ आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली. ही सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली. तसेच अवधूतवाडी ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

Web Title: Invalid lobbying jewelers, forage at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.