अवैध खरेदीचा एपीएमसीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:00 PM2018-10-20T22:00:54+5:302018-10-20T22:01:34+5:30

वणी शहरातील विविध भागात असलेल्या अवैध धान्य खरेदी केंद्रांमुळे वणी बाजार समितीला चांगलाच फटका बसत आहे. शुक्रवारी बाजार समितीच्या पथकाने अशा तीन केंद्रावर धाडी टाकल्या. तत्पूर्वी संभाजी ब्रिगेडनेदेखिल बुधवारी नांदेपेरा मार्गावर सुरू असलेल्या एका केंद्रावर धाड टाकून पोलखोल केली.

Invalid purchase hit APMC | अवैध खरेदीचा एपीएमसीला फटका

अवैध खरेदीचा एपीएमसीला फटका

Next
ठळक मुद्देधाडसत्राने धान्य व्यापारी हादरले : वणी शहरात १५ पेक्षा अधिक अवैध केंद्रे

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी शहरातील विविध भागात असलेल्या अवैध धान्य खरेदी केंद्रांमुळे वणी बाजार समितीला चांगलाच फटका बसत आहे. शुक्रवारी बाजार समितीच्या पथकाने अशा तीन केंद्रावर धाडी टाकल्या. तत्पूर्वी संभाजी ब्रिगेडनेदेखिल बुधवारी नांदेपेरा मार्गावर सुरू असलेल्या एका केंद्रावर धाड टाकून पोलखोल केली.
वणी तालुक्यात सोयाबीनची कापणी झाली असून हे सोयाबीन विक्रीसाठी वणी येथे आणले जात आहे. या शेतकऱ्यांनी धान्य खासगी व्यापाऱ्यांनाच विकावे, यासाठी काही दलाल सक्रिय झाले असून शेतकºयांना भुलथापा देऊन हे दलाल शेतकऱ्यांचा माल खासगी व्यापाऱ्यांच्या दारात नेत आहेत. रोखेत चुकारा मिळत असल्याने शेतकरीदेखिल खासगी व्यापाऱ्यांकडे धान्यविक्रीसाठी वळत असल्याचे चित्र आहे. मात्र हा व्यवहार गैरकायदेशीर आहे. शहरात अनेक व्यापाऱ्यांनी धान्य खरेदीसाठी दुकाने उघडली आहेत. नियमानुसार परवानाधारक व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या यार्डातच धान्य खरेदी करावी लागते. परंतु बाजार समितीचा सेस चुकविण्यासाठी या व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या यार्डाबाहेर परस्पर धान्य खरेदीचा सपाटा सुरू केला. यामुळे केवळ बाजार समितीलाच नाही, तर शासनाच्या तिजोरीलादेखिल फटका बसत आहे. बाजार समितीच्या यार्डात धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बाजार समितीचा सेस चुकता करावा लागतो. सोबतच शासनाची बाजार फि अदा करावी लागते. मात्र अनेक व्यापारी हे टाळण्यासाठी स्वतंत्र दुकानदारी उघडून धान्य खरेदी करीत आहे. वणी शहरात १५ पेक्षा अधिक असे खरेदीदार असल्याची माहिती आहे. बाजार समितीने कारवाईचा धडाका असाच सुरू ठेवला, तर त्याचा फायदा बाजार समितीला होणार आहे. बाजार समिती कारवाई करीत असली तरी त्यात राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे.
बाजार समितीची तीन व्यापाऱ्यांना नोटीस
४वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पथकाने वणी शहरातील तीन प्रतिष्ठानांवर धाडी टाकून अवैधरित्या खरेदी केलेले ६० लाख रूपये किंमतीचे सोयाबीन जप्त केले होते. या तिनही व्यापाऱ्यांना बाजार समितीने शनिवारी नोटीस दिली. व्यापाऱ्यांनी बुडविलेला सेस, बाजार फी व त्यावरील दंडाची रक्कम २४ तासाच्या आत बाजार समितीकडे जमा करावी, अन्यथा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे. यातून दंड, सेस व बाजार फीसाठी बाजार समितीला व्यापाºयांकडून दोन लाख ४९ हजार २६० रूपये दंडापोटी मिळणार आहे.

Web Title: Invalid purchase hit APMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.