वागत स्मशानभूमीच्या विकासकामात अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:44 AM2021-05-11T04:44:18+5:302021-05-11T04:44:18+5:30
दोन महिन्यांपूर्वी स्मशानभूमीच्या विकासाकरिता जनसुविधेअंतर्गत पाच लाखांचा निधी उपलब्ध झाला. कंत्राटदाराने कोरोनाच्या प्रादुर्भावात संधी साधून घाईगडबडीत अत्यंत निकृष्ट दर्जाचे ...
दोन महिन्यांपूर्वी स्मशानभूमीच्या विकासाकरिता जनसुविधेअंतर्गत पाच लाखांचा निधी उपलब्ध झाला. कंत्राटदाराने कोरोनाच्या प्रादुर्भावात संधी साधून घाईगडबडीत अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले. बांधकामात अनियमितता झाली. काम चालू होण्यापूर्वी जाधव आणि नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना १५ मार्च २०२१ रोजी निवेदन दिले होते. मात्र, दुर्दैवाने कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या माध्यमातून अक्षम्य दुर्लक्ष झाले.
बांधकामाचा दर्जा ढासळला असून, काम अत्यल्प खर्चामध्ये करून संबंधित कंत्राटदार मालामाल झाला. या कामात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप मनीष जाधव यांनी केला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी स्थळ भेट देऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. ग्रामपंचायतीच्या एप्रिलमध्ये झालेल्या मासिक सभेत सदस्य व ग्रामस्थांनी बांधकाम ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे दिसून आले.
बॉक्स
कंत्राटदार, अभियंत्यावर कारवाई करा
ग्रामस्थांनीही कामाची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांनीही गुणवत्ता विभागाकडून कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. दोषी आढळल्यास कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधित अभियंत्यास निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
कोट
बांधकाम जवळपास पूर्णत्त्वास जात आहे. संबंधित अभियंत्यांनी कामाची पाहणी केली. कामाचे बिलसुद्धा टाकण्यात आले.
बी. के. साखरे,
ग्रामसेवक, वागत ग्रामपंचायत