इस्त्राईलचे शेती तज्ज्ञ डेहणीत
By admin | Published: February 28, 2017 01:24 AM2017-02-28T01:24:18+5:302017-02-28T01:24:18+5:30
इस्त्राईलचे तंत्रज्ञान वापरुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातून बाभूळगाव तालुक्याची निवड यासाठी केली आहे.
शेतकऱ्यांशी चर्चा : उपसा सिंचन प्रकल्पाजवळील शेताची पाहणी
बाभूळगाव : इस्त्राईलचे तंत्रज्ञान वापरुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातून बाभूळगाव तालुक्याची निवड यासाठी केली आहे. दरम्यान सोमवारी इस्त्राईलच्या शेती
तज्ज्ञांनी डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाजवळील शेताची पाहणी केली. संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून अडीअडचणी जाणून घेतल्या.
प्रकल्पाची उभारणी करून बेंबळा प्रकल्पाच्या पाण्याचा या प्रकल्पालासाठी उपयोग केला जाणार आहे. शेताच्या पाहणी प्रसंगी इस्त्राईलचे शेती तज्ज्ञ गॅबिनउम, प्रिवा मोरे, अमेय जोगळेकर, जलसंपदा सचिव व्ही.एम. कुळकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खेवले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंघला, जलसंपदाचे मुख्य अभियंता लांडेकर, पाटबंधारे अधीक्षक अभियंता काटपल्लीवार, राजीव ढोकलिया, तहसीलदार दिलीप झाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, तालुका कृषी अधिकारी खडसे, चव्हाळे, डॉ. शेंदूरकर, भाऊ गावंडे, कृष्णा रंगारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)