मारेगावात अतिक्रमणाचा वाद चिघळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:49 AM2021-08-18T04:49:01+5:302021-08-18T04:49:01+5:30

शहरात अतिक्रमणाचा वणवा दिवसेंदिवस हनुमानाच्या शेपटीसारखा लांबत आहे. अनेक लेआऊटमधील ओपनस्पेस गुप्त झाले आहेत. त्यावरही अनधिकृत कब्जा होत आहे. ...

The issue of encroachment will simmer in Maregaon | मारेगावात अतिक्रमणाचा वाद चिघळणार

मारेगावात अतिक्रमणाचा वाद चिघळणार

Next

शहरात अतिक्रमणाचा वणवा दिवसेंदिवस हनुमानाच्या शेपटीसारखा लांबत आहे. अनेक लेआऊटमधील ओपनस्पेस गुप्त झाले आहेत. त्यावरही अनधिकृत कब्जा होत आहे. रस्ते आकुंचन पावत आहेत. दोन दशकांपूर्वी सार्वजनिक जागेवर उभे केलेले विजेचे खांब आता नागरिकांच्या घरात गेले आहेत. तर शहरातील अनेक रस्त्यांचे अस्तित्वच संपले आहे. या रस्त्यांवर पक्की घरे बांधली गेली आहेत. त्यामुळे रस्त्याचे अस्तित्व संपले आहे. जागेच्या मालकी हक्काचा कोणताही पुरावा नसताना या लोकांना विजेचे मीटरही मिळाले आहेत. नळाची जोडणीही मिळाली आहे. सगळा गोंधळ सुरू आहे. शहरातील अनेक रस्तेच लुप्त होत असताना नगरपंचायत मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्रस्त झालेली जनता आता आक्रमक झाली असून या विरोधात नगरपंचायतीसमोर घंटानाद आंदोलन करीत आहे.

Web Title: The issue of encroachment will simmer in Maregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.