हद्दवाढीचा विषय बारगळला

By admin | Published: June 11, 2014 11:39 PM2014-06-11T23:39:09+5:302014-06-11T23:39:09+5:30

वणी शहराच्या हद्दवाढीचा विषय मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड विरोधानंतर बारगळला. त्यामुळे नगराध्यक्षांच्या ‘अजेंड्या’वरच पाणी फेरले गेल्याची चर्चा सुरू आहे.

The issue of extremes has become stale | हद्दवाढीचा विषय बारगळला

हद्दवाढीचा विषय बारगळला

Next

सर्वसाधारण सभा : नगराध्यक्षांच्या छुप्या अजेंंड्यावर फिरले पाणी
वणी : वणी शहराच्या हद्दवाढीचा विषय मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड विरोधानंतर बारगळला. त्यामुळे नगराध्यक्षांच्या ‘अजेंड्या’वरच पाणी फेरले गेल्याची चर्चा सुरू आहे.
नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा काल मंगळवारी पार पडली. या सभेत प्रमुख तीन विषय होते. त्यात कंट्रोल मॅप, शहराची हद्दवाढ आणि विकास कामे सुचविणे, या विषयांचा समावेश होता. सोबतच कंत्राटदारांची अनामत रक्कम परत करण्याचाही विषय होता.

वणी शहरासभोवताल काही परिसर आहे. त्यात काही ठिकाणी वसाहती निर्माण झाल्या आहेत. मात्र त्यापैकी काही वसाहती ना नगरपरिषद क्षेत्रात मोडतात, ना लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात मोडतात. परिणामी अशा वसाहतींकडे ग्रामपंचायती आणि नगरपरिषदेचे दुर्लक्ष होते. तेथे विकास कामे करता येत नाही. त्यामुळे शहराची हद्दवाढ करून अशा क्षेत्रांना नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ट करण्याचा विषय होता.
नगरपरिषद क्षेत्राची हद्दवाढ करताना शहरासभोवतालच्या अशा वसाहतींचा समावेश करतानाच काही इतर परिसराचाही हद्दवाढीत नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ट करण्याचा ‘घाट’ घालण्यात आला होता, अशी माहिती आहे. यात काही ठिकाणी आता ले-आउटची निर्मिती झाली आहे. मात्र सदर ले-आउट तूर्तास नगरपरिषद हद्दीत मोडत नाही. त्यामुळे त्यांना नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठीच हा हद्दवाढीचा विषय खुद्द नगराध्यक्षांनी उचलून धरल्याची माहिती आहे. मात्र सभेत विरोधकांसह काही सत्ताधारी सदस्यांनीही या हद्दवाढीला विरोध दर्शविल्याने अखेर हा विषय बारगळला.
शहराचा आकार दिवसेंदिवस वाढत असून आधीच शहरवासीयांना अनेक मूलभूत सुविधा मिळत नाही. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. काही भागातील नागरिकांना अद्यापही बोअरवेलचेच पाणी पुरविले जाते. शहरातील अनेक ले-आउटही अद्याप पूर्णपणे विकसित झाले नाही. तसेच शहरालगतच्या कोणत्याही ग्रामपंचायतीने हद्दवाढ करण्याचा प्रस्तावही दिला नाही. असे असतानाही सर्वसाधारण सभेत हद्दवाढीचा विषय उपस्थित झाला, हे विशेष. त्यामुळे ही हद्दवाढ भू माफियांसाठी करण्यात येत आहे काय, असा संतप्त प्रश्न काही नगरसेवकांनी उपस्थित केला.
याच सभेत नगरपरिषदेच्या विविध कामांसाठी करारनामे करणाऱ्या काही कंत्राटदारांना अनामत रक्कम परत करण्याचाही विषय होता. तथापि काही कंत्राटदारांनी करारनामे करूनही संबंधित काम पूर्ण केले नसल्यामुळे त्यांना अनामत रक्कम परत करू नये, अशी भूमिका काही सदस्यांनी मांडली. करारनामे करूनही कंत्राटदारांनी कामे न केल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त करावी, अशी त्यांची भूमिका होती. विरोध प्रबळ असल्याने हा विषयही काल मार्गी लागू शकला नाही. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The issue of extremes has become stale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.