महागाव फुलसावंगी रस्त्याचा प्रश्न अखेर विधानसभेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:40 AM2021-03-06T04:40:25+5:302021-03-06T04:40:25+5:30
परिसरातील नागरिकांनी डझनाच्या वर तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्या. मात्र, उगीचच चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी थातूरमातूर कामावर ...
परिसरातील नागरिकांनी डझनाच्या वर तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्या. मात्र, उगीचच चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी थातूरमातूर कामावर पांघरूण कसे घालता येईल, याकडे लक्ष देऊ लागले. अखेर या रस्त्याचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या कामाबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देताना अधिकार्यांच्या अहवालावरून काम व्यवस्थित होत असल्याची टिप्पणी जोडली.
१४ किलोमीटरच्या अंतरात अद्यापही सीडी वर्कचे काम पूर्ण व्यवस्थित झाले नाही. कामात ट्यूब लेवल नसल्यामुळे छोट्या वाहनाला वाहतुकीला बराच अडथळा निर्माण होतो. या परिसरातील नागरिकांनी वारंवार आंदोलने केली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कंत्राटदाराला पाठीशी घातले जात आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि विधिमंडळाची दिशाभूल बांधकाम विभागाचे अधिकारी करीत असल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.