...मग नवरी मिळेल तरी कशी? ‘मुला’चा अट्टहास कायम, राज्यातील २२ जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर घटला

By विलास गावंडे | Published: February 18, 2024 06:11 AM2024-02-18T06:11:33+5:302024-02-18T06:12:14+5:30

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सातत्याने होणारी जनजागृती, लिंगनिदानावर बंदी, कायद्यानुसार कारवाईचा धाक असतानाही मुलीचे गर्भपात होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

It is a shocking fact that girls are having miscarriages | ...मग नवरी मिळेल तरी कशी? ‘मुला’चा अट्टहास कायम, राज्यातील २२ जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर घटला

...मग नवरी मिळेल तरी कशी? ‘मुला’चा अट्टहास कायम, राज्यातील २२ जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर घटला

विलास गावंडे

यवतमाळ : स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सातत्याने होणारी जनजागृती, लिंगनिदानावर बंदी, कायद्यानुसार कारवाईचा धाक असतानाही मुलीचे गर्भपात होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. परिणामी राज्यातील २२ जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर घटला आहे. ‘मुलगाच हवा’च्या अट्टहासापायी उमलण्यापूर्वीच गर्भातच कळ्यांची हत्या केली जात आहे. दोन वर्षांत घटलेला मुलींचा जन्मदर चिंताजनक आहे.

एकीकडे मुलीच्या जन्माचे धूमधडाक्यात स्वागत केले जाते, तर दुसरीकडे कुटुंबाच्या वंशाला दिवा हवाच, यासाठी आग्रह धरला जातो.

राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे येथे झालेल्या बैठकीत राज्यातील लिंग गुणोत्तर प्रमाणाचा आढावा घेण्यात आला. यात ही आकडेवारी पुढे आली.

उपाययोजनांची गरज

मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध उपाययोजनांची गरज आहे. शिवाय, पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.

सोनोग्राफी सेंटरची वेळोवेळी तपासणी व्हायला पाहिजे. त्या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क राहण्याची गरज आहे. यासाठी समन्वयकही नियुक्त आहेत. दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात किती सोनोग्राफी सेंटर आहेत, याची माहिती उपसंचालकस्तरावर घेतली जात आहे.

शासनाने घेतली दखल

गर्भलिंग निदान आणि मुलींचे गर्भपात मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या बाबीची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.

आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे कुटुंब कल्याण माता बालसंगोपन व शालेय  आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड (पुणे) यांनी सांगितले.

जिल्हानिहाय घटते प्रमाण 

जिल्हा  २०१९   २०२२   घट

जालना  १०२२   ८५४    १६८

अकोला  ९५२    ९०२    ५०

नांदेड   ९५६    ९०७    ४९

नंदुरबार ९६३    ८५७    ४७ 

सांगली  ९०६    ८५७    ४९

सिंधुदुर्ग ९६१    ९५०    ११

लातूर   ९३०    ९१८    १२

सोलापूर ९२३    ९११    १२

नाशिक  ९१०    ८९७    १३

गडचिरोली       ९५४    ९४०    १४

अहमदनगर     ८९३    ८७९    १४

नागपूर  ९४२    ९२३    १९

धुळे    ९०३    ८८३    २०

परभणी  ९३०    ९१०    २०

अमरावती       ९५२    ९३०    २२

छ.संभाजीनगर   ९०९    ८८६    २३

रायगड  ९५५    ९२४    ३१

यवतमाळ       ९३२    ८९३    ३९

धाराशिव ९१३    ८७४    ३९

भंडारा   ९४५    ९०५    ४०

गोंदिया  ९८९    ९४७    ४२

रत्नागिरी ९५३    ९११    ४२

Web Title: It is a shocking fact that girls are having miscarriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.