...अन् डॉक्टरने मुलांना पोलिओऐवजी सॅनिटायझर पाजलं; अखेर धक्कादायक कारण आलं समोर

By मुकेश चव्हाण | Published: February 2, 2021 07:42 PM2021-02-02T19:42:06+5:302021-02-02T19:50:18+5:30

12 बालकांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे. 

It is learned that the doctor gave sanitizer instead of polio to the children as they were busy on their mobile phones | ...अन् डॉक्टरने मुलांना पोलिओऐवजी सॅनिटायझर पाजलं; अखेर धक्कादायक कारण आलं समोर

...अन् डॉक्टरने मुलांना पोलिओऐवजी सॅनिटायझर पाजलं; अखेर धक्कादायक कारण आलं समोर

Next

यवतमाळ/ मुंबई: राज्यभरात पोलिओ लसीकरणाची मोहिमे मोठ्या थाटामाटात राबवण्यात आली. मात्र यवतमाळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणामुळे 12 बालकांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे. 

सॅनिटायझर दिलेल्या 12 मुलांना सुरक्षितता म्हणून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागात दाखल करण्यात आले. त्यांना कुठलाही त्रास जाणवत नसल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले. एका मराठी वृत्तावाहिनीने दिलेल्या वृत्तानूसार या प्रकरणाच्या चौकशीनंतर मोबाईलवर व्यस्त असल्यानं डॉक्टरने पोलिओऐवजी सॅनिटायझर पाजल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

संबंधित प्रकरणात तेथील वैद्यकीय अधिकारी (सीएचओ), आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका या तीन जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी सांगितले. याशिवाय वरिष्ठ डॉक्टरांवरही निलंबनासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाण्याचे संकेत त्यांनी दिले.  भंडारा येथील दुर्घटनेनंतर यवतमाळ जिल्ह्यातील या घटनेने आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, कनिष्ठांचा बळी देऊन वरिष्ठ डॉक्टरांना सोडता कामा नये, असे मत व्यक्त केले जात आहे.

पोलिओऐवजी सॅनिटायझर दिलेल्या 12 मुलांना बालरोग विभागात दाखल केले आहे. यातील कुणालाच कुठला त्रास नाही. सर्व मुले ठणठणीत आहेत. केवळ खबरदारी म्हणून त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे, अशी यवतमाळमधील शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी दिली आहे.

दरम्यान, देशभरात पल्स पोलिओच्या लसीकरण मोहिमेला 31 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. मुलांना पोलिओ होऊ नये म्हणून दोन पोलिओचे दोन थेंब दिले जातात. 2 फेब्रुवारीपर्यंत देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत मुलांना पोलिओ लस दिली जाते. 30 जानेवारीला राष्ट्रपती भवनामध्ये काही मुलांना पोलिओचे दोन थेंब देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. 
 

Web Title: It is learned that the doctor gave sanitizer instead of polio to the children as they were busy on their mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.