शेतकऱयांवर आली बैल विकायची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 12:23 PM2021-02-08T12:23:09+5:302021-02-08T12:23:35+5:30
Yawatmal News परतीच्या पावसाने अतोनात नुकसान केल्याने शेतकऱयांवर आता आपले आवडती सर्जेरायची जोडी विकायची वेळ आली आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : 'दिवस सुगीचे सुरू जाहले, ओला चारा बैल माजले' ही कविता प्रत्येकाने लहानपणी ऐकली आहेच. मात्र परतीच्या पावसाने अतोनात नुकसान केल्याने शेतकऱयांवर आता आपले आवडती सर्जेरायची जोडी विकायची वेळ आली आहे . नापिकीमुळे जेथे स्वतःच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण होणार आहे तेथे शेतीपयोगी बैल आणि इतर जनावरांचा सांभाळ करायचा कसा, असा प्रश्न शेतकऱयांसमोर निर्माण झाला आहे.. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील बैलबाजार सर्वदूर प्रसिद्ध आहे . २० एकरावरील या बैल बाजार यावेळी यंदा बळीराजाने आपले बैल विकण्यासाठी अक्षरश: मांदियाळी केली.
भविष्यातील महागणारा चारा पाहता अनेक शेतकऱयांनी बैलजोडी आठवडा बाजारात विक्रीस आणली, परंतु खरेदीदारा समोरदेखील चाऱयाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे बैल घेणाऱयांनी फारच कमी किंमत सांगितली. काही शेतकऱयांनी बैलजोडी माघारी नेण्याचे ठरविले तर काहींनी हतबल होत मिळेल त्या किमतीत बैलजोडी विकली.या बैल बाजारात आलेल्या शेतकऱयांची आगतिकता बरेच काही सांगून जाते .