जगजितसिंग ओबेरॉय यांना लोकमतचा ‘कॉर्पोरेट एक्सलन्स’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:55 PM2018-03-13T23:55:39+5:302018-03-13T23:55:39+5:30

राज्याच्या औद्योगिक विकासातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल येथील जगजितसिंग ओबेरॉय प्रा.लि.चे संचालक जगजितसिंग ओबेरॉय यांना लोकमत ‘कॉर्पोरेट एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Jagjit Singh Oberoi won Lokmat's 'Corporate Excellence' award | जगजितसिंग ओबेरॉय यांना लोकमतचा ‘कॉर्पोरेट एक्सलन्स’ पुरस्कार

जगजितसिंग ओबेरॉय यांना लोकमतचा ‘कॉर्पोरेट एक्सलन्स’ पुरस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देराज्याच्या औद्योगिक विकासातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल येथील जगजितसिंग ओबेरॉय प्रा.लि.चे संचालक जगजितसिंग ओबेरॉय

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्याच्या औद्योगिक विकासातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल येथील जगजितसिंग ओबेरॉय प्रा.लि.चे संचालक जगजितसिंग ओबेरॉय यांना लोकमत ‘कॉर्पोरेट एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईच्या वरळी भागातील फोर सीझन्स हॉटेलमध्ये शनिवारी झालेल्या शानदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्वमेहनतीने राज्याच्या औद्योगिक विकासात वाटा ठरलेले, या क्षेत्रात नव्याने आलेले तरुण उद्योजक अशा ४७ उद्योजकांना हा पुरस्कार देण्यात आला. यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला स्थान देण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातून जगजितसिंग ओबेरॉय हे या गौरवाचे मानकरी ठरले आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबातील हरप्रीतकौर ओबेरॉय, सुखवंशसिंग ओबेरॉय, स्वप्नीतकौर ओबेरॉय यांची उपस्थिती होती.
हिंदी सिनेअभिनेता सोनू सुद, ‘होणार सून मी या घरची’ फेम अभिनेता शशांक केतकर यांच्यासह खासदार अरविंद सावंत, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, फॅशन डिझायनर शायना एन.सी., मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, विशेष पोलीस महानिरीक्षक (पीसीआर) कैसर खालिद, अन्न व औषधे प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे, ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, एडीटर इन चीफ राजेंद्र दर्डा, समूह संपादक दिनकर रायकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
जगजितसिंग जसवंतसिंग ओबेरॉय हे गेली अनेक वर्षांपासून उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे. विकासाची अनेक दर्जेदार कामे त्यांच्या हातून झाली आहे. या कार्याची पावती त्यांना लोकमत ‘कॉर्पोरेट एक्सलन्स’ पुरस्काराच्या रूपाने मिळाली आहे. याबद्दल त्यांचे स्वागत होत आहे.

Web Title: Jagjit Singh Oberoi won Lokmat's 'Corporate Excellence' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.