‘ जयकिसान ’ सुरू होण्याची आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:48 AM2021-09-12T04:48:25+5:302021-09-12T04:48:25+5:30
माजी आमदार दिवंगत हरिश मानधना यांनी ‘जयकिसान’ची नोंदणी केली. श्यामराव बापू देशमुख, ॲड. शंकरराव राठोड, बाबू पाटील जैत, दिवंगत ...
माजी आमदार दिवंगत हरिश मानधना यांनी ‘जयकिसान’ची नोंदणी केली. श्यामराव बापू देशमुख, ॲड. शंकरराव राठोड, बाबू पाटील जैत, दिवंगत उत्तमराव शेळके, नामदेवराव पाटील, दिवंगत पूनमचंद सारडा, दादासाहेब देशकरी, सुखदेवराव भाकरे, अरुण जोहरापुरकर, सुभाष राठोड आदींच्या पुढाकारातून मे १९८९ मध्ये हा कारखाना सुरू झाला होता. ८८३० भाग धारकांसह ऊस उत्पादक शेतकरी व ४०० कर्मचारी आणि दीड हजारांवर कामगारांना यामुळे रोजीरोटी मिळत होती.
बॉक्स
दहा वर्षांत दहा लाख मेट्रिक टनाचे गाळप
प्रतीदिन अडीच हजार टन गाळप क्षमता असलेल्या जयकिसान साखर कारखान्याने १९९७ व १९९९ हे दोन वर्ष वगळता दहा वर्षांत एकूण नऊ लाख ८६ हजार ७११ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यानंतर दुष्काळी परिस्थितीमुळे क्षमते एवढा ऊस उपलब्ध न झाल्याने २००४ साली कारखाना बंद पडला. आता हा कारखाना भाडे तत्त्वावर देण्यात येणार असल्याची चर्चा असल्याने शेतकरी, कामगार सुखावला आहे.
बॉक्स
भाडे तत्त्वावर ही तीन हंगामात केले गाळप
साखर उताऱ्यात घट, क्षमता इतके गाळप न झाल्याने दीर्घ, मध्यम मुदतीच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरता आले नाही. त्यातच साखर साठा कोटा पद्धतीने विक्री होत असल्याने साखर पडून राहिली. अखेर २००६ मध्ये हा कारखाना अवसायनात काढण्यात आला. त्यानंतर वारणा सहकारी साखर कारखान्याने २००६ ते २०१२ या कालावधीसाठी तो भाडे तत्त्वावर घेतला. त्यांनी तीन गाळप हंगामही यशस्वी करून दाखविले.
कोट
कारखान्याची साईट फिजिबल आहे. कमी वाहतूक खर्चात ऊस उपलब्ध होऊ शकतो. आता तर सिंचनासह वाहतूक सुविधा वाढल्या आहेत. कारखाना पुन्हा सुरू झाल्यास तो व्यवस्थित चालेल. तसेच या भागाच्या विकासाला नव्याने गती मिळेल.
- बाबू पाटील जैत,
माजी अध्यक्ष, जयकिसान सहकारी साखर कारखाना
कोट
कारखाना सुरू झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. ऊस उत्पादन हे हमखास उत्पन्न देणारे पीक आहे. कारखाना सुरू करण्यासाठी सामूहिक प्रयत्न हवेत.
- सुभाष राठोड, शेतकरी, बोदेगाव
कोट
सध्या ऊस उत्पादन कमी झाले असले तरी कारखाना सुरू होणार असेल तर ऊस लागवड वाढेल. शेतकऱ्यांना उत्पन्न आणि बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो.
- निरंजन कुटे, शेतकरी, वरूड
कोट
कारखाना बंद पडल्याने हजारो कामगारांचा रोजगार गेला. यातील अनेकजण निवृत्तीच्या वाटेवर आहेत. कारखाना सुरू झाल्यास बाकी रक्कम मिळेल. रोजगारही वाढेल.
- रघुनाथ डहाके, उपाध्यक्ष, कामगार संघटना
कोट
कारखाना बंद पडल्याने कामगारांवर मोठे संकट कोसळले आहे. रोजगाराचे इतर साधन उपलब्ध नाही. त्यामुळे हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत.
- राजेंद्र गुल्हाने, सहा. अभियंता, कारखाना
110921\fb_img_1631344910767.jpg
१)कारखाना फोटो
२)सुभाष राठोड शेतकरी
३)निरंजन कुटे शेतकरी
४)रघुनाथ डहाके कर्मचारी
५)राजेंद्र गुल्हाने कर्मचारी
६)बाबुपाटील जैत माजी अध्यक्ष