उमेदवारांचे जेलभरोे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:37 PM2018-06-24T22:37:06+5:302018-06-24T22:37:36+5:30
राज्यातील जिल्हा न्यायालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात तीन लाख उमेदवारांना परीक्षेसाठी अपात्र ठरविण्यात आल्याने संतप्त उमेदवारांनी रविवारी दाते कॉलेज चौकात जेलभरो आंदोलन केले. त्यांनी प्रक्रिया रद्दची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यातील जिल्हा न्यायालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात तीन लाख उमेदवारांना परीक्षेसाठी अपात्र ठरविण्यात आल्याने संतप्त उमेदवारांनी रविवारी दाते कॉलेज चौकात जेलभरो आंदोलन केले. त्यांनी प्रक्रिया रद्दची मागणी केली.
भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या नेतृत्वात रविवारी १०:३० वाजता जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्या उमेदवारांनी राज्यातील जिल्हा न्यायालयांची भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. न्यायालय भरती प्रक्रियेत आठ हजार ९२१ जागांकरिता तीन लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी केवळ ९० हजार परीक्षेला पात्र ठरविण्यात आले. उर्वरित तीन लाख उमेदवारांना कुठल्या कारणाने अपात्र ठरविण्यात आले, याचे कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या नेतृत्वात रविवारी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आले.
या अांदोलनाचा एक भाग म्हणून यवतमाळात जेलभरो आंदोलन झाले. भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भुवन मुनेश्वर, भारतीय युवा मोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष प्रशांत मुनेश्वर, प्रचारक प्रफुल पाटील, नीलेश चव्हाण, अश्विनी गोरले, स्वप्निल नगराळे, संजय गोरडे, सुनील वासनिक, हमीद पठाण, मतीन सय्यद यांच्यासह अनेक उमेदवार या आंदोलनात सहभागी झाले होते.