जैन भागवती दीक्षा गुणगौरव सोहळा
By Admin | Published: April 11, 2016 02:34 AM2016-04-11T02:34:32+5:302016-04-11T02:34:32+5:30
जैन भागवती दीक्षा गुणगौरव कार्यक्रम येथील नवजीवन मंगल कार्यालयात घेण्यात आला.
यवतमाळ : जैन भागवती दीक्षा गुणगौरव कार्यक्रम येथील नवजीवन मंगल कार्यालयात घेण्यात आला. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ पहूरच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाभूळगाव येथील गुरू गणेश गोशाळेचे अध्यक्ष प्रकाशचंद छाजेड होते. पदमचंद बाफना परिवारातील काही सदस्यांनी जैन भागवती दीक्षा घेण्याचा संकल्प केला होता. त्याला अनुसरून जैन भागवती दीक्षा गुणगौरव समारंभ घेण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष अमरचंद गांधी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ पहूरचे अध्यक्ष अशोकचंद दर्डा, सकल जैन समाजाचे पदमचंद बाफना आदी मंचावर उपस्थित होते.
राज्याध्यक्ष अमरचंद गांधी म्हणाले, त्याग, संयम, तप आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्यासाठी जैन धर्मात जैन भागवती दीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्तमान परिस्थितीत जैन समाजाला सामाजिक दायित्व एकजूट होवून राबविणे गरजेचे आहे. अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रकाशचंद छाजेड यांनी बाफना परिवारातील सदस्यांची प्रशंसा केली.
पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह म्हणाले, जैन भागवती दीक्षा मी जवळून बघितली आहे. जैन धर्म विश्वधर्म असून अहिंसेची शिकवण देणारा आहे.
प्रियता प्रवीण दर्डा, पूजा मनोज कोटेचा यांनी स्वागतगीत सादर केले. अभिनंदन गीत राखी आनंद दर्डा, वंदना चेतन दर्डा यांनी गायिले. ममता बाफना व पुष्पा तोडरवाल यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.
मंगलपाठ आशीष बाफना यांनी केले. संचालन प्रा. दिलीप बंब व राजश्री बंब यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रेमचंद बोरा, सुरेश तोडरवाल, डॉ. रवी कोटेचा, चेतन दर्डा, नरेंद्र दर्डा, आनंद दर्डा, डॉ. सतीश दर्डा, रिखब तोडरवाल, डॉ. रितेश कोटेचा, नीलमचंद तोडरवाल आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)