जैन संघटनेतर्फे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव
By admin | Published: April 18, 2016 04:55 AM2016-04-18T04:55:35+5:302016-04-18T04:55:35+5:30
संपूर्ण जगाला सत्य, अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या २६१५ या
यवतमाळ : संपूर्ण जगाला सत्य, अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या २६१५ या जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन भारतीय जैन संघटनेच्या यवतमाळ शहर शाखेव्दारा रविवार १९ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन ठरविण्यात आले आहे.
त्यामध्ये १९ एप्रिलला प्रामुख्याने सकाळी ६ वाजता मंगलध्वजारोहण त्यानंतर ६.३० वाजता दिगंबर जैन मंदिर माळीपुरा येथून प्रभात यात्रा निघेल, सकाळी ९ वाजता जैन युवकांतर्फे मोटरसायकलव्दारा अहिंसा ंसंदेश रॅली काढण्यात येईल. सकाळी ११ वाजता के.सी. बरलोटा चारिटेबल ट्रस्टतर्फे शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्कीटांचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर लगेचच आराधना भवन येथे जैन सोशल ग्रुप व भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात येईल. सायंकाळी ७ वाजता चंद्रपूर येथील प्रीतमजी कोचर यांचा भक्तीमय भजनसंध्या कार्यक्रम व बक्षीस वितरण तसेच समारोपीय कार्यक्रम केसरिया भवन लकडगंज येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाला सकल जैनबंधू, भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष उमेश बैद, सचिव संदीप कोचर, मार्गदर्शक डॉ. रमेश खिवसरा, प्रकल्प अधिकारी श्याम भंसाली, संजय झांबड, अशोक कोठारी, प्रवीण बोरा, राजेंद्र गेलडा, कस्तुरचंद सेठीया, रवींद्र बोरा, आदेश लुणावत, जितेश लुणावत, राजेश गुगलिया, संतोष कोचर, संजय बोथरा, राहुल चोपडा, चेतन पारेख, अनिल ओसवाल, ललित कोठडीया, मयुर मुथा, सौरभ बोरा आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)