अभियांत्रिकीच्या सात विद्यार्थ्यांना जवाहरलाल दर्डा सुवर्णपदक
By admin | Published: February 23, 2017 04:15 AM2017-02-23T04:15:59+5:302017-02-23T04:15:59+5:30
अभियांत्रिकीच्या विविध विभागांतून टॉपर ठरलेली निहारिका प्रमोदकुमार सिंग हिच्यासह
यवतमाळ : अभियांत्रिकीच्या विविध विभागांतून टॉपर ठरलेली निहारिका प्रमोदकुमार सिंग हिच्यासह सात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्णपदक जाहीर झाले आहे. गुरुवारी होणाऱ्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३३व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना या पदकाने सन्मानित केले जाणार आहे.
राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपती विजय भटकर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा गौरव होणार आहे. अभियांत्रिकीच्या सर्व विभागांतून प्रथम आणि विविध सहा विभागांतून प्रथम आलेल्या सहा विद्यार्थ्यांना
या सुवर्णपदकाने सन्मानित केले जाईल.
विविध सहा विभागांतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग शाखेची दीपाली राठोड, अकोलाच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या केमिकल इंजिनिअरिंंगचा इरफान शहा, शेगाव येथील संत गजानन महाराज कॉलेज आॅफ इंजिनिअरिंंगच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची अनुश्री देशमुख, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंंग कॉलेजच्या कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंंगची सपना चवरे, संत गजानन महाराज कॉलेज आॅफ इंजिनिअरिंंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशनची श्वेता बारब्दे, पुसदच्या बाबासाहेब नाईक कॉलेज आॅफ इंजिनिअरिंंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेचा स्वप्नील सपकाळ यांचा समावेश आहे.
या सहा विद्यार्थ्यांनाही जवाहरलाल दर्डा सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. (प्रतिनिधी)