जवाहरलाल दर्डा स्कूल संघाला दुहेरी विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:41 PM2018-09-07T23:41:00+5:302018-09-07T23:42:13+5:30

नेहरू स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत १४ व १९ वर्षाआतील मुलांच्या गटात जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलने दिमाखदार विजेतेपद पटकाविले. १७ वर्षे गटात लोकनायक बापूजी अणे विद्यालय संघ अव्वल ठरला.

Jawaharlal Darda School team bagged the double title | जवाहरलाल दर्डा स्कूल संघाला दुहेरी विजेतेपद

जवाहरलाल दर्डा स्कूल संघाला दुहेरी विजेतेपद

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हास्तर शालेय हँडबॉल स्पर्धा : मुलींच्या गटात राळेगाव, यवतमाळ संघ विजयी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नेहरू स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत १४ व १९ वर्षाआतील मुलांच्या गटात जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलने दिमाखदार विजेतेपद पटकाविले. १७ वर्षे गटात लोकनायक बापूजी अणे विद्यालय संघ अव्वल ठरला.
मुलींच्या १४ वर्षे वयोगटात न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव, १७ वर्षे गटात दादासाहेब गवई इंग्लिश स्कूल यवतमाळ व १९ वर्ष गटात अणे महिला महाविद्यालयाच्या चमूने विजय संपादन करून विभागस्तरावर प्रवेश मिळविला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय यवतमाळच्यावतीने या स्पर्धा १ ते ३ सप्टेंबर रोजी घेण्यात आल्या. या स्पर्धेत मुलांच्या १४ वर्ष गटात नऊ तर मुलींच्या गटात सात संघ, १७ वर्ष गटात मुलांच्या आठ व मुलींचे पाच संघ व १९ वर्ष गटात मुलांचे सात व मुलींच्या चार संघाने सहभाग नोंदविला.
१४ वर्ष मुलांच्या गटात अंतिम सामन्यात जवाहरलाल दर्डा इंग्लिश स्कूल स्वर्णलीला वणी संघाचा १८ विरूद्ध ३ अशा तब्बल १५ गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकाविले. अक्षित भगत, वरूण साखरकर, केतन कदम यांनी विजयी संघातर्फे सर्वोत्कृष्ट खेळ केला. मुलींच्या गटात न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव संघाने जवाहरलाल दर्डा इंग्लिश स्कूलचा ८ विरूद्ध ४ गोलने पराभव केला. विजयी संघातर्फे मयूरी बोटरे, राधिका राऊत, पूनम वनस्कर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
१७ वर्ष मुलांच्या गटात लोकनायक बापूजी अणे विद्यालय संघाने अव्वल स्थान पटकाविले. त्यांनी ब्रिलियंट स्कूल राळेगाव संघावर ११ विरूद्ध चार असा एकतर्फी विजय मिळविला. अंश गटलेवार, कलश जाधव, सुशांत राऊत यांनी विजयी गोल केले. मुलींच्या गटात अंतिम सामना चुरशीचा झाला. प्रथमच सहभागी होणाऱ्या दादासाहेब गवई इंग्लिश स्कूल संघाने जायन्ट्स स्कूल यवतमाळ संघावर ३-२ अशी मात करीत विजय प्राप्त केला. विजयी संघातर्फे नयनी बोरकर, साथी सामंत, तनिशा मानवटकर यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला, तर पराभूत संघातर्फे राणी सोलंकी हिने दोन गोल केले.
१९ वर्ष मुलांच्या गटात जवाहरलाल दर्डा इंग्लिश स्कूलने विराणी सायन्स राळेगाव संघावर २० विरूद्ध १० अशा १० गोलने एकतर्फी विजय नोंदविला. कार्तिक कदम, युवराज मोटके, सोफिन कोटाडिया, मयंक राठी, राहुल गुंडेवाड यांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मुलींच्या गटात अणे महिला महाविद्यालयाने न्यू इंग्लिश राळेगाव संघाचा ७-३ अशा गोलने पराभव करीत अव्वल स्थान पटकाविले. विजयी संघातर्फे कोमल गाडेकर, साक्षी सिरसाठ, रूचिका मडावी, धनश्री गोरे, पिंकी शर्मा यांनी विजयी गोल केले.
विजयी संघ अमरावती येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेत पंच म्हणून अमोल जयसिंगपुरे, सुरज कडुकार, जागृती डगवार, दिनेश ब्राह्मणवाडे, गणेश सिरसाठ, राधिका जयस्वाल, संदेश जोगळेकर, शरद बद्दमवार, वैभव चव्हाण, अभिषेक चव्हाण, निखिलेश बुटले, अनिता भागडे यांनी काम पाहिले.

Web Title: Jawaharlal Darda School team bagged the double title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.