जेवलीच्या महिलांची ठाण्यावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 11:58 PM2019-03-22T23:58:12+5:302019-03-22T23:58:55+5:30
उमरखेड तालुक्यातील जेवली येथे अवैध दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. मटका, जुगाराचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक ठिकाणी चोरीसारखे गुन्हे होत आहे. येथील अवैध धंदे त्वरित बंद करावे, या मागणीसाठी महिलांनी थेट बिटरगाव पोलीस ठाण्यावर शुक्रवारी धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बिटरगाव : उमरखेड तालुक्यातील जेवली येथे अवैध दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. मटका, जुगाराचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक ठिकाणी चोरीसारखे गुन्हे होत आहे. येथील अवैध धंदे त्वरित बंद करावे, या मागणीसाठी महिलांनी थेट बिटरगाव पोलीस ठाण्यावर शुक्रवारी धडक दिली.
जेवली गावात अवैधपणे देशी दारू व हातभट्टीच्या दारूची विक्री होत आहे. सहज दारू उपलब्ध होत असल्याने पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दारूच्या नशेत भांडण व हाणामारीच्या घटना सतत वाढत आहे. गावातील तरुण अवैध धंद्यांमुळे व्यसनाच्या आहारी गेले आहे. गावातील अवैध दारू दुकानांवर पोलिसांनी अजूनही कारवाई केली नाही. गावात पूर्णत: दारूबंदी करावी व अवैध धंद्यांवरही नियंत्रणा आणावे, या मागणीसाठी जेवलीच्या महिला सरपंच आरती लावरे, पोलीस पाटील आनंदा दळवी, सुनील देवसरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष भीमराव देवसरकर, हानू पिलवंड यांच्या नेतृत्वात गावातील महिलांनी ठाणेदार विजय चव्हाण यांना निवेदन दिले.