विनाक्रमांकाचा जेसीबी जप्त

By admin | Published: January 12, 2017 12:50 AM2017-01-12T00:50:48+5:302017-01-12T00:50:48+5:30

रेती चोरट्यांविरुद्ध महसूल विभागाने मोहीम उघडली आहे. शनिवारी वडकी येथे सात,

JCB of random number seized | विनाक्रमांकाचा जेसीबी जप्त

विनाक्रमांकाचा जेसीबी जप्त

Next

महसुलची कारवाई : राळेगाव पोलिसात गुन्हा
राळेगाव : रेती चोरट्यांविरुद्ध महसूल विभागाने मोहीम उघडली आहे. शनिवारी वडकी येथे सात, तर राळेगाव येथे चार ट्रॅक्टर विविध घाटावरून रेती भरून जात असताना पकडण्यात आले. याच मोहिमेत येवती येथून रेतीचे खनन करण्यासाठी वापरली जाणारी जेसीबी मशीन जप्त करण्यात आली. येवतीचे तलाठी नीलेश देवळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राळेगाव पोलिसांनी येवती येथील राजेंद्र ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
या जेसीबीवर आरटीओचा क्रमांक नसल्याने मशीनबाबत विविध चर्चा सुरू आहे. विनाक्रमांकाच्या जेसीबीचे प्रकरण जिल्ह्यात प्रथमच समोर आले आहे. हिरापूर घाटातून तब्बल सात ट्रॅक्टर रेती वाहतूक करताना पकडण्यात आले आहे. हिरापूर रेतीघाट शासनाने लिलावात दिला असल्यानंतरही इतक्या मोठ्या प्रमाणावर रेतीची चोरी होण्यामागणी कोणकोणती कारणे आहे याचा शोध घेण्याचे आव्हान महसूलच्या स्थानिक व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आहे. पाचपट दंड ठोठावण्याचा आणि रेती चोरट्यांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करण्याचा आदेश आहे. रेती चोर पकडल्यानंतर पुन्हा रेती चोरी करणार नाही, असा प्रतिज्ञालेखही महसूल विभागाला दिला जातो. तरीही पुन्हा चोरीत सामिल होत असल्याचे प्रकार पुढे येत आहे. शासनाचा धाक रेती चोरट्यावर नाही, असे यातून दिसत आहे. तहसीलदार हेमंत गांगुर्डे, मंडळ अधिकारी विश्वास वाघ, बी.एन. पोटे, यू.जी. कर्णेवार यांच्यासह तलाठी व इतर महसूल कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला आहे. जेसीबी जप्तीप्रकरणी होणाऱ्या दंडाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: JCB of random number seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.