‘जेडीआयईटी’चा विद्यार्थी उपविजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:12 PM2019-04-13T22:12:17+5:302019-04-13T22:12:45+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी अभिजित बालकृष्ण राऊत याने शोध प्रकल्प स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा इन्क्युबेशन इनोव्हेशन व लिंकेजेस बोर्ड आणि संगणक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक राष्ट्रीय शोध प्रकल्प स्पर्धा घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी अभिजित बालकृष्ण राऊत याने शोध प्रकल्प स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा इन्क्युबेशन इनोव्हेशन व लिंकेजेस बोर्ड आणि संगणक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक राष्ट्रीय शोध प्रकल्प स्पर्धा घेण्यात आली. यात अभिजित राऊत याने स्मार्ट स्विच-होम आॅटोमेशन युझिंग आयओटी अँड ब्लू-टूथ या विषयावर शोध प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाला उपविजेतेपद मिळाले. त्याचा सिल्वर मेडल व दहा हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
या स्पर्धेंतर्गत एसजीबीएयू स्टार्ट-अप फेस्ट व विद्यार्थ्यांच्या संशोधन गुणांना वाव देण्यासाठी स्टार्ट-अप इको सिस्टीम या अंतर्गत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेत उत्कृष्ट असे ४० शोध प्रकल्प सादर झाले होते. प्रकल्प स्पर्धेचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर होते. त्यांनी उपस्थित संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जेडीआयइटीतर्फे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धात भाग घेण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहित केले जाते. विदेशातील आंतरराष्ट्रीय परिषद व स्पर्धेत भाग घेण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. अभिजित राऊत यालाही महाविद्यालय आणि संगणक अभियांत्रिकी विभागाकडून मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्याने मिळविलेल्या यशाचे कौतुक होत आहे.