‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड
By admin | Published: May 23, 2017 01:20 AM2017-05-23T01:20:42+5:302017-05-23T01:20:42+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांची नेदरलँडमधील कंट्रोलयुनियन या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांची नेदरलँडमधील कंट्रोलयुनियन या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये लखन धार्मिक, पूनम गलांडे, वर्षा राठोड यांचा समावेश आहे.
आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सदर कंपनी टेक्सटाईल जगतातील आंतरराष्ट्रीयस्तरावर विविध कंपनीचे गुणवत्ता परीक्षण तसेच त्यांना प्रमाणित करण्याचे काम करते. कंट्रोल युनियनचे कार्य ७० हून अधिक देशात आहे. भारतात १२ ठिकाणावरून कामकाज चालते. ही कंपनी नेदरलँडस्थित असून परीक्षणाच्या विविध लेबॉरटरीजचे जाळे जगभर पसरले आहे. जेडीआयईटीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या चमूमध्ये कंट्रोलयुनियनचे प्रोग्राम मॅनेजर राजेश सेलवा, सर्टिफीकेशन मॅनेजर विदेश कदम, सर्टिफीकेशन टेक्सटाईल मॅनेजर श्रेयश काजवे, ह्यूमन रिसोर्स मॅनेजर हरमिंदर कौर रैना यांचा समावेश होता. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १.८ लाख वार्षिक पॅकेज देण्यात आले.