‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांचा टेक टेक्सटाईलमध्ये सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:37 AM2017-10-11T00:37:53+5:302017-10-11T00:38:08+5:30

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई येथे झालेल्या ‘टेक टेक्सटाईल’मध्ये सहभाग नोंदविला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान आणि संशोधन एकाच ठिकाणी अनुभवता आले.

JDIET students participate in tech textile | ‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांचा टेक टेक्सटाईलमध्ये सहभाग

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांचा टेक टेक्सटाईलमध्ये सहभाग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई येथे झालेल्या ‘टेक टेक्सटाईल’मध्ये सहभाग नोंदविला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान आणि संशोधन एकाच ठिकाणी अनुभवता आले.
मेस फँकफ्रूट या संस्थेतर्फे हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. टेक्नीकल टेक्सटाईलमधील विविध भागातील उत्पादकांना एकाच व्यासपीठावर आपले नवीन तंत्रज्ञान सादर करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. भारतासह चीन, जर्मनी, इटली, आॅस्ट्रेलिया यासारख्या देशांनी आपला सहभाग या प्रदर्शनात नोंदविला होता.
‘जेडीआयईटी’च्या टेक्सटाईल विभागातील १६ विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी झाले होते. यात केविन पटेल, मयूर महेंद्रकर, विशाल सावंकर, पूनम लढ्ढा, रश्मी मोंदेकर, कुणाल ज्योतवानी, रितेश पटेल, आश्विनी आवारे, रिचा डहाके, अविनाश दास, अक्षय कैकाडे, मिडो मोदी, श्वेता पानपाटील, आदित्य अनकमवार, अक्षय मानधना, अनसारी मोहम्मद यांचा समावेश होता.
जागतिक संशोधनाची दिशा व गरज याची सांगड या विद्यार्थ्यांना शिकावयास मिळाली. या भागातील संधी तंत्रज्ञान व संशोधन या सर्व बाबी एकाच ठिकाणी पहावयास मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. वेगवेगळ्या कंपन्यांच्या वरिष्ठांशी चर्चा झाल्यामुळे त्याचा फायदा कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये होईल, असे मत त्यांनी नोंदविले.
विद्यार्थ्यांच्या या सहभागाचे संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, टेक्सटाईल विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड आदींनी कौतुक केले. प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. राम सावंत, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. सुरज पाटील, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे यांनी परिषदेतील सहभागाबद्दल विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
 

Web Title: JDIET students participate in tech textile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.