‘जेडीआयईटी’चे ६९ विद्यार्थी ‘टीबीएसएस’मध्ये

By admin | Published: March 16, 2017 12:57 AM2017-03-16T00:57:32+5:302017-03-16T00:57:32+5:30

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ६९ विद्यार्थ्यांची टाटा बिझनेस सपोर्ट सर्विसेस

JDIET's 69 students in 'TBSS' | ‘जेडीआयईटी’चे ६९ विद्यार्थी ‘टीबीएसएस’मध्ये

‘जेडीआयईटी’चे ६९ विद्यार्थी ‘टीबीएसएस’मध्ये

Next

यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ६९ विद्यार्थ्यांची टाटा बिझनेस सपोर्ट सर्विसेस (टीबीएसएस) या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ही कंपनी १४८ वर्षे जुन्या टाटा ग्रुपची सबसिडरी कंपनी आहे. प्रॉडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट आणि बिझनेस प्रोसेस मॅनेजटमेंट या क्षेत्रात अग्रणी आहे.
टेलिकॉम सर्विसेस, इन्शोरन्स सर्विसेस, रिटेल सर्विसेस, आॅटोमोबाईल सर्विसेस, मीडिया सर्विसेस, कस्टमर केअर मॅनेजमेंट, ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग मॅनेजमेंट आणि इतर बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट सर्विसेस क्षेत्रात ही कंपनी काम करते. ‘जेडीआयईटी’मध्ये झालेल्या इन कॅम्पस ड्राईव्हमध्ये महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष सर्व शाखेतील पात्र विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ग्रुप डिस्कशन, टेक्नीकल इंटरव्ह्यू, एचआर इंटरव्ह्यूच्या फेऱ्यांमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग व केमिकल इंजिनिअरिंग शाखेतून सदर कंपनीत विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मनीषा कांडे, गौरव गोसावी, आंचल बत्रा, आसावरी दुधे, जया मेश्राम, अंकिता कोमावार, शैलेश चंदनखेडे, स्वप्नील वरारकर, धनश्री मोगरकर, मृणालिनी सावरकर, चैताली सामुद्रे, काजोल छाबडा, ऐश्वर्या ठमके, रवींद्र कालुरकर, शुभदा ढोले, सुविधा महानूर, भूषण गुगलिया, कुंदन ढोबरे, आशीष नेहारे, वैष्णवी वरघट, प्रतीक्षा मेहरे, नुपूर तिवलकर, नैना जयस्वाल, नेहा चिंचोळकर, प्रज्योत आवारी, नयना ढोणे, श्रद्धा बुरेवार, वैभव हांडे, समीक्षा गुल्हाने, मयूरी भगत, कोमल हेडावू, श्रद्धा सेलूकर, अश्विन त्रिपाठी, विवेक घाटोळे, ऐश्वर्या अग्रवाल, ऐश्वर्या म्हैसेकर, चेतन ढुमणे, आदित्य काळे, नेहा तिवारी, शिवानी जवणे, किरण पांढरे, नेहा मोरे, साजीद काझी, नूतन निनाट, नयन ढवले, हर्षित काढव, ऐश्वर्या पाठक, शेख कासीम, कपिल वरघने, जय गंडेछा, आदित्य उघडे, चेतन भिवगडे, सुमित जैन, शांताराम भोयर, श्याम नंदनवार, सशांत ठाकरे, कुणाल तुंडलवार, अमीर सोहील, प्रज्योत राऊत, अक्षय मोतीपवार, आदित्य ठाकूर, शुभम वाघ, शुभम नागतोडे, कुणाल सानप, अक्षय सुरजुसे, शुभम हजारे, कुणाल शेजावू, रितेश पिंपळे, अमोल बनाईत या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना १५ दिवसांचे (१३० तास) टाटा ग्रुपतर्फे दिले जाणारे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण करणे अनिवार्य आहे. कंपनीच्या मुंबई, पुणे, ठाणे व खोपोली येथील कार्यालयात त्यांना कस्टमेअर सर्विसेस रिप्रेझेंटेटीव्ह या पदावर रुजू करून घेतले जाणार आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी कंपनीतर्फे टेकरिच इंजिनिअरिंग सर्विसेसमधून प्रमोद दुबे, प्रदीप वसू यांनी कामकाज पाहिले. टेकरिच इंजिनिअरिंग सर्विसेस ही कंपनी टाटा बिझनेस सपोर्ट सर्विसेससोबत एका करारांतर्गत रिक्रुटमेंटचे कामकाज पाहते. (वार्ताहर)

 

Web Title: JDIET's 69 students in 'TBSS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.