‘जेडीआयईटी’चा इपिक रिसर्चशी सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 10:02 PM2017-11-07T22:02:08+5:302017-11-07T22:02:20+5:30
महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना प्रशिक्षित करण्याच्यादृष्टीने इपिक रिसर्च प्रा.लि.सोबत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने सामंजस्य करार केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना प्रशिक्षित करण्याच्यादृष्टीने इपिक रिसर्च प्रा.लि.सोबत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने सामंजस्य करार केला आहे. इपिक कंपनीतर्फे भारतात व अन्य देशातील सर्व महत्त्वाच्या शेअर बाजारांमध्ये आर्थिक सेवा पुरविते. त्यामध्ये इक्विटी, कमोडिटी, फ्यूचर्स, आॅक्शन्स, फॉरेन एक्सचेंज या व इतर सेवांचा समावेश आहे.
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील काही विभाग प्रमुख आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट आॅफिसरच्या चमूने इंदोर येथील या कंपनीला भेट दिली. या भेटीमध्ये काही ठळक बाबींवर सामंजस्य करार करण्यात आला. यामध्ये रिक्रूटमेंट, विद्यार्थी व फॅकल्टीसाठी आॅन द जॉब ट्रेनिंग, इन हाऊस मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम, रिसर्च वर्क अँड रिसर्च प्रोजेक्ट आदी बाबींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक फायदा होईल या बाबीचाही यामध्ये समावेश आहे.
इपिक रिसर्चचे पदाधिकारी तसेच सीईओ मुस्तफा नदीम, रिक्रूटमेंट स्पेशालिस्ट सेव्हीयो जॉर्ज, अकाऊंट्स अँड फायनान्स मॅनेजर कुतुबुद्दिन हुसैन आदी यावेळी उपस्थित होते. जेडीआयईटीतर्फे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट आॅफिसर राहुल फाळके व इपिकचे सीईओ मुस्तफा नदीम यांनी संयुक्त करारावर स्वाक्षºया केल्या.