‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची ‘पीव्ही’ टेक्सटाईलमध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:18 PM2018-07-08T22:18:58+5:302018-07-08T22:20:05+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील सत्र २०१७-१८ च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची पीव्ही टेक्सटाईल हिंगणघाट या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील सत्र २०१७-१८ च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची पीव्ही टेक्सटाईल हिंगणघाट या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये नीलिमा खाडे, अर्पिता बसोटिया, पूजा मेसारे, सोनाली किलनाके यांचा समावेश आहे. आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे एक्झीक्यूटिव्ह पदावर त्यांची निवड करण्यात आली.
पीव्ही टेक्सटाईल हा प्रगतशील उद्योगसमूह आहे. विविध प्रकारचे कापड आणि धागा याठिकाणी बनविला जातो. या कंपनीत ५०० एअर जूट लूम आहे, तर दररोज दोन लाख मीटर कापडाचे उत्पादन होते. कंपनीचे कार्य संपूर्ण देशभर आहे. याठिकाणी उत्पादित मालाची परदेशातही निर्यात केली जाते.
कंपनीतर्फे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट एस.के. गुप्ता, जनरल मॅनेजर बी.एस. सहाने, ह्यूमन रिसोर्स मॅनेजर अर्चना देव यांची कॅम्पस इंटरव्ह्यूप्रसंगी उपस्थिती होती. टेक्नीकल टेस्ट, प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.