‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची बंगलोरच्या कंपनीत निवड
By admin | Published: July 3, 2017 02:06 AM2017-07-03T02:06:04+5:302017-07-03T02:06:04+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल विभागातील सत्र २०१६-१७ या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची अरविंद लि.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल विभागातील सत्र २०१६-१७ या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची अरविंद लि. बेंगलोर या टेक्सटाईल उद्योग क्षेत्रातील कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये तृप्ती पाठक, रवी कटारे, उमेश पाटील, मेहरा फाळके, अंजली सिंगनजुळे यांचा समावेश आहे.
अरविंद लि. ही भारतातील टेक्सटाईल उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय अहमदाबाद गुजरातमध्ये आहे. ही कंपनी शर्टिंग, डेनिम, निट्स आणि बॉटमवेट फॅबरिक्स बनविते. या कंपनीचे फ्लार्इंग मशीन, न्यू पोर्ट, रफ अँड टफ, अरविंद आरटीडब्ल्यू इत्यादीसारखे स्वत:चे ब्रॅण्ड आहेत. अॅरो, ली, रॅगलर आदींसारखे लायसन्स इंटरनॅशनल ब्रॅण्ड आहे. अशा महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कंपनीत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. कंपनीचे ह्यूमन रिसोर्स मॅनेजर विकास त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतला.
सर्वप्रथम टेक्नीकल टेस्ट घेण्यात आली. नंतर मुलाखतीद्वारे पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना प्रथम तीन महिने मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती देण्यात आली. नंतर त्यांना २.६४ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले जाईल.
टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची आतापर्यंत नेदरलँड स्थित कंट्रोल युनियन, व्हीएचएम इंडस्ट्रीज लि. अमरावती, आर.एस.जे. इन्स्पेक्शन सर्विसेस प्रा.लि. मुंबई, डोनिअर सुटिंग लि. सुरत, श्याम इंडोफॅब प्रा.लि. अमरावती, यासारख्या नामांकित टेक्सटाईल कंपनीत निवड झाली आहे. टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना आतापर्यंत १.६ ते २.६४ लाखांच्या वार्षिक पॅकेजवर महाविद्यालयातर्फे कॅम्पस प्लेसमेंट झालेले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे टेक्सटाईल अभियांत्रिकी विभागातर्फे कौतुक करण्यात येत आहे.