‘जेडीआयईटी’चे विद्यार्थी नामांकित कंपनीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 09:46 PM2018-04-01T21:46:59+5:302018-04-01T21:46:59+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल केमिकल व सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाच्या २२ विद्यार्थ्यांची मुंबई येथील पारस कॅड प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल केमिकल व सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाच्या २२ विद्यार्थ्यांची मुंबई येथील पारस कॅड प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ही कंपनी इंजिनिअरिंग प्रोक्यूअरमेंट आणि कंस्ट्रक्शन सेगमेंटमध्ये विविध प्रकारच्या अभियांत्रिकी उत्पादन आणि सेवा देणारी कंपनी आहे.
या कंपनीतील कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय मानक व प्रक्रियेतील सखोल ज्ञान असल्याने तेल व नैसर्गिक वायू अभियांत्रिकी आणि बांधकाम या क्षेत्रात सेवा पुरविते. कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे. ते एक आॅटोमेशन इनोव्हेशन सेंटर या नावाने अमेरिका, युरोप, मध्यपूर्व आशिया, पॅसिफिक व भारतात प्रचलित आहे. अशा या नामांकित कंपनीने जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्ह घेतला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांची आॅफ लाईन अॅप्टीट्यूड टेस्ट घेण्यात आली. यात यशस्वी विद्यार्थ्यांचा टेक्नीकल व एचआर इंटरव्ह्यू घेण्यात आला. यातून मेकॅनिक व इंजिनिअर शाखेतील अनिकेत जगताप, अनिरूद्ध राठोड, आधिश गोसावी, विशाल चौरे, अक्षय ठाकरे, आतिब शेख, आकाश पेटकर, प्रिया खराबे, अक्षय गायकवाड, शुभम नवघरे, उदय ठाक, स्नेहल पानोडे, केमिकल इंजिनिअरिंग शाखेतून शुभम कांबळे, स्नेहा कनकमवार, कांचन डाबरे, विशाल तिळगुळे, किसन तिवारी, अरविंद बोधे, नजीम शेख, अनुपमा बोबडे, प्रियंका निमजे, सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतून ऐश्वर्या गोटेकर या विद्यार्थ्यांची निवड झाली.
ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात ज्युनिअर पाईपिंग इंजिनिअर या पदावर रुजू करून घेतले जाणार आहे. ड्राईव्हकरिता कंपनीतर्फे कन्सलटंट प्रमोद देशमुख, हेमंत सदाफळे, पाईपिंग इंजिनिअर सफी फैजम उपस्थित होते.