‘जेडीआयईटी’चे विद्यार्थी नामांकित कंपनीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:51 PM2018-04-06T23:51:10+5:302018-04-06T23:51:10+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील ३१ विद्यार्थ्यांची औरंगाबाद येथील नरेश इंजिनिअरिंग वर्कस् या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील ३१ विद्यार्थ्यांची औरंगाबाद येथील नरेश इंजिनिअरिंग वर्कस् या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ही कंपनी प्रेसिजन प्रेशर डाय कास्टेड आॅटोपार्ट्स व प्रेसिजन मशिन्स कंपोनंट्स उत्पादन करणारी आहे.
सोबतच आॅटो पार्ट्स, हेवी ड्यूटी जॉब वर्क, सीएनसी टर्न अँड कंपोनंट्स, अॅल्यूमिनिअम प्रेशर डाय कास्टींग, सीएनसी मशीन वर्कस्, टूल रूम वर्कस्, डाय कास्टींग, प्रेशर ग्रॅव्हीटी सेपरेटर आणि व्हीएमसी मशीन कंपोनंट्स या क्षेत्रात काम करते. या क्षेत्रातील चांगल्या दर्जाची मशीन उत्पादक कंपनी अशी ओळख आहे.
या कंपनीतर्फे जेडीआयईटीमध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेच्या पात्र विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात सर्वप्रथम विद्यार्थ्यांची आॅफ लाईन अॅप्टीट्यूड टेस्ट घेण्यात आली. यात यशस्वी विद्यार्थ्यांचा टेक्नीकल व एचआर इंटरव्ह्यू घेण्यात आला. यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील अक्षय पवार, अविनाश शेळके, अक्षय वानखडे, अर्शद शेख, मोसीन शाह रजा, आकाश गिऱ्हेपुंजे, शुभम कालनकर, कार्तिक रोकडे, पंकज भगत, हितेश जयसिंगपुरे, नीलेश भक्ते, गणेश भांडेकर, शेख अहेफाज हरून, मोहसीन शेख, शिवम राठोड, मयूर दुधे, शिवम काळे, अश्विन वैद्य, वैभव तुमसरे, खुशाल बारापात्रे, शुभम राऊत, शुभम चिंते, ध्रुव आनंदपारा, उदय ठाक, अझाझ हुसेन शेख, प्रियंका देवकते, मयूरी कुर्वे, रेणूका प्यारलेवार, पिंकी तुरणकर, सुमती आढव, किरण बढिये या विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. त्यांना प्रॉडक्शन इंजिनिअर या पदावर कंपनीच्या औरंगाबाद येथील कार्यालयात रुजू करून घेतले जाणार आहे.