‘जेडीआयईटी’चे विद्यार्थी नामांकित कंपनीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:14 PM2018-04-10T23:14:48+5:302018-04-10T23:14:48+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २६ विद्यार्थ्यांची इंदौर येथील ‘मेक माय हाऊस’ या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २६ विद्यार्थ्यांची इंदौर येथील ‘मेक माय हाऊस’ या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. आर्किटेक्चरल व इंटेरिअर डिझायनर कन्सल्टींग कंपनी असलेल्या या कंपनीचे स्वत:चे वेब पोर्टल आहे. या पोर्टलद्वारे ही कंपनी भारतात सर्वत्र आपली सेवा पुरविते. घराचे प्लान, कमर्शिअल इमारती, इंटेरिअर डिझाईन, फ्लोअर डिझाईन व एलिव्हेशन डिझाईनसारख्या सेवा दिल्या जातात.
या कंपनीतर्फे ‘जेडीआयईटी’मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये सिव्हील व मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वप्रथम पात्र विद्यार्थ्यांची आॅनलाईन अॅप्टीट्यूड टेस्ट घेण्यात आली. यात पात्र विद्यार्थ्यांची गटचर्चा झाली. यात यशस्वी विद्यार्थ्यांची टेक्नीकल व एचआर इंटरव्ह्यूद्वारे अंतिम निवड करण्यात आली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतून पूजा मोटे, ऐश्वर्या गोटेकर, शिवानी हातगावकर, संकेत कोल्हे, अब्दुल तौसिफ, मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील विक्की भालतिलक, महेश देशमुख, विवेक कोरे, चंद्रकांत चौधरी, धनंजय खंजिर, पंकज बैस, शुभम ठाकरे, आकाश पेटकर, नीलेश भक्ते, अक्षय गायकवाड, दिशा रंगारी, दर्पण दीक्षित, अश्विनी वैद्य, अनिकेत जगताप, शहा मोहसीन रजा, स्वप्नील संभे, कल्याणी भोकरे, आदिश गोसावी, अजिंक्य अहेरकर, यश कुंभारे, वृषभ राजबिंडे याचा समावेश आहे. त्यांना बिझनेस डेव्हलपमेंट, बिझनेस कन्सल्टंट व सेल्स इंजिनिअर या पदावर कंपनीच्या इंदौर येथील कार्यालयात रूजू करून घेतले जाणार आहे.
कंपनीतर्फे या विद्यार्थ्यांना २.२७ लाख प्रती वर्ष पॅकेज घोषित करण्यात आले आहे. कॅम्पस ड्राईव्हसाठी कंपनीतर्फे मुस्तफा जोहर, नदीम जोहर आदींनी काम पाहिले.