‘जेडीआयइटी’चे विद्यार्थी नामांकित कंपनीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 09:56 PM2019-03-31T21:56:11+5:302019-03-31T21:56:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांची रॉन्च पॉलिमर प्रा.लि. पुणे या नामांकित कंपनीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांची रॉन्च पॉलिमर प्रा.लि. पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. महाविद्यालयात झालेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अॅप्टीट्यूड टेस्ट, टेक्नीकल इंटरव्ह्यू आणि पर्सनल इंटरव्ह्यूच्या फेऱ्या घेण्यात आल्या. यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील नऊ, तर इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग शाखेतील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील सागर मनवर, कैलास चव्हाण, राहुल अंबादरे, राजसा चिकटे, यश दोलताडे, अंकुश वडतकर, शरयू पाटणे, अभिनव फुलमाळी, शुभम पाटील, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग शाखेतून गौरव गुल्हाने, गौरी ढोणे, श्वेता तुंडलवार, राणी गायकवाड, अंबर रंगारी यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी कंपनीच्या पुणे येथील कार्यालयात ट्रेनी इंजिनिअर या पदावर नियुक्ती दिली जाणार आहे. कंपनीतर्फे एचआर मॅनेजर राजेश वानखेडे व दुर्गेश पुरी यांनी निवड प्रक्रिया पार पाडली.
रॉन्च पॉलिमर या कंपनीला प्लास्टिक मोल्डींग क्षेत्रात एक दशकाचा अनुभव आहे. उच्च गुणवत्ता, वेळेवर पुरवठा व योग्य किमतीसाठी हा ग्रुप ओळखला जातो. प्लास्टिक, अॅल्यूमिनीयम, मोल्ड मेकिंग, वितरण, सी अँड एफ सेवा या पाच भागात हा ग्रुप विभागला आहे. इलेक्ट्रोलक्स, एक्साईड, हिंदुस्थान लिव्हर, देवु अँकर इलेक्ट्रॉनिक्स लि., टाटा आॅटो प्लास्टिक लि., फिएट इंडिया लि. यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना लागणाऱ्या साधन सामुग्रीचा पुरवठा रॉन्चतर्फे केला जातो. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.