‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 09:59 PM2018-05-23T21:59:14+5:302018-05-23T21:59:14+5:30

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांची इंडोरामा सिंथेटिक लि. नागपूर या बहुराष्ट्रीय टेक्सटाईल कंपनीत निवड झाली आहे. यात वैभव पद्मशाली, चेतन वारंबे व अक्षय भोयरकर यांचा समावेश आहे.

JDIT's students opt for multinationals | ‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांची इंडोरामा सिंथेटिक लि. नागपूर या बहुराष्ट्रीय टेक्सटाईल कंपनीत निवड झाली आहे. यात वैभव पद्मशाली, चेतन वारंबे व अक्षय भोयरकर यांचा समावेश आहे.
इंडोरामा सिंथेटिक ही टेक्सटाईल जगतातील आंतरराष्ट्रीयस्तरावरील नामांकित कंपनी आहे. इटली मुख्यालय असलेली ही कंपनी भारतात १९८९ पासून कार्यरत आहे. गेली दोन दशकांपासून जलद वाढणाऱ्या पॉलिस्टर क्षेत्रामध्ये प्रमुख निर्माता व पुरवठादार कंपनी बनली आहे. ही कंपनी पॉलिस्टर स्टेपल फायबर, पार्टली ओरिएंटेड यार्न, ड्रॉ टेक्स्ट्रीज्ड यार्न व पॉलिस्टर चीप्स तयार करते. या कंपनीने गेली काही वर्षात पॉलिस्टर क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
या कंपनीतर्फे विद्यार्थ्यांच्या इंटरव्ह्यूसाठी ह्युमन रिसोर्स व इंडस्ट्री रिलेशन विभाग प्रमुख निशिकांत भोरे, ह्युमन रिसोर्स विभागाचे असिस्टंट मॅनेजर अजय ढोबळे उपस्थित होते. सर्वप्रथम टेक्नीकल टेस्ट घेण्यात आली. मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २.१ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
 

Web Title: JDIT's students opt for multinationals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.