‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची रेमण्ड कंपनीमध्ये निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:52 PM2018-09-19T22:52:28+5:302018-09-19T22:52:44+5:30

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी युवराज जोशी याची येथील नामांकित रेमण्ड युको डेनिम प्रा.लि. या कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती दिली असून २.४ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे.

JDIT's students opted for Raymond Company | ‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची रेमण्ड कंपनीमध्ये निवड

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची रेमण्ड कंपनीमध्ये निवड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी युवराज जोशी याची येथील नामांकित रेमण्ड युको डेनिम प्रा.लि. या कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती दिली असून २.४ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे.
‘जेडीआयईटी’च्या टेक्सटाईल विभागातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अंतिम वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कंपनीतर्फे वर्क्स डायरेक्टर नितीन श्रीवास्तव, ह्यूमन रिसोर्स मॅनेजर प्रशांत दिघे, जनरल मॅनेजर जी.के. पाडी यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम टेक्नीकल टेस्ट घेण्यात आली. मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.
केंद्र व राज्य सरकारच्या नव्या वस्त्रोद्योग धोरणामुळे या उद्योग क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. अनेक ठिकाणी टेक्सटाईल पार्क साकारले जात आहे. तसेच वस्त्रोद्योगासंबंधी अनेक पायाभूत सुविधा राज्यात ठिकठिकाणी उपलब्ध असल्याने अनेक मोठ्या कंपन्या वस्त्रोद्योगाचा विस्तार झपाट्याने करत आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत.

Web Title: JDIT's students opted for Raymond Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.