‘जेडीआयईटी’ टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:21 PM2018-05-04T23:21:28+5:302018-05-04T23:21:28+5:30

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग इंस्टिट्यूट इन इंडिया’ हा सन्मान प्राप्त झाला आहे. पुणे येथे सातव्या हायर एज्यूकेशन अँड एचआर समिटमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

'JediT' top private engineering institute | ‘जेडीआयईटी’ टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट

‘जेडीआयईटी’ टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे येथील सोहळ्यात सन्मान : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांची तांत्रिक परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग इंस्टिट्यूट इन इंडिया’ हा सन्मान प्राप्त झाला आहे. पुणे येथे सातव्या हायर एज्यूकेशन अँड एचआर समिटमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध व अद्यावत सोयीसुविधा विचारात घेऊन हा पुरस्कार दिला जातो.
राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (आरयूएसए), आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्नीकल एज्यूकेशन (एआयसीटीई) तसेच अनेक नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी ही समिट आयोजित केली होती. ‘एआयसीटीई’चे संचालक मनप्रित सिंग मन्ना यांच्या हस्ते ‘जेडीआयईटी’चे प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी पुरस्कार स्वीकारला.
संपूर्ण वायफाय परिसर, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज प्रयोगशाळा, डिजिटल कॉलेज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, बायोमेट्रिक सुविधा, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, मुलांचे वसतिगृह आदी सुविधा ‘जेडीआयईटी’मध्ये आहेत. अद्यावत लायब्ररी सॉफ्टवेअर असून पुस्तके विद्यार्थ्यांना एका क्लिकवर उपलब्ध आहेत. दोन हजारच्यावर विद्यार्थी महाविद्यालयात ज्ञानार्जन करतात.
गेली पाच वर्षात महाविद्यालयाने ४० विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविले आहेत. विद्यापीठाच्या परीक्षेत उत्तीर्णतेचे प्रमाण ८० टक्केच्यावर आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावरील तांत्रिक परिषदांमध्ये भाग घेण्यासाठी आर्थिक सहकार्य दिले जाते. देशविदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी अभियंते म्हणून सेवा देत आहेत. विद्यापीठाची आॅथोराईज्ड रिसर्च लॅब असून ४० विद्यार्थी आपले संशोधन करू शकतात. विविध तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि नामांकित कंपन्यांसोबत संशोधन व विकास तसेच प्लेसमेंटच्या उद्देशाने महाविद्यालयाने अनुबंध करार केला आहे. सामाजिक उपक्रमातही महाविद्यालयाचा सहभाग आहे. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट असोसिएशनच्या विद्यमाने ‘एनर्जी पार्क’च्या माध्यमातून १०० किलोवॅट वीज निर्मिती केली जाते.
यापूर्वी ‘जेडीआयईटी’ला एज्यू-रँड यूएसएने अमरावती विद्यापीठात प्रथम, तर महाराष्ट्रातील पहिल्या दहाच्या यादीत स्थान दिले होते. आयआरआयएफने (इनोव्हेटर अँड रिसर्चर इंटरनॅशनल फोरम, अमेरिका) ग्रेड ‘ए’ तसेच नॅशनल एज्यूकेशन लिडरशीप अवॉर्डतर्फे वेस्ट झोनमधील आऊटस्टँडींग इंजिनिअरिंग इंस्टिट्यूट व बेस्ट इंस्टिट्यूट इन इव्हेंट हे सन्मान मिळाले आहेत. महाविद्यालयाला मिळालेल्या या सन्मानाबद्दल संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष विजय दर्डा, अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा यांनी अभिनंदन केले.
 

Web Title: 'JediT' top private engineering institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.