येशूंनी समाजाची पुनर्बांधणी केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 09:49 PM2017-12-05T21:49:28+5:302017-12-05T21:49:49+5:30
येशू ख्रिस्तांचा अनुयायी कुणालाही गुलाम करीत नाही, तो कुणाचा गुलाम देखील होत नाही. मानवी सेवा करणाºयांचे येशू ख्रिस्तांजवळ सर्वात वरचे स्थान आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : येशू ख्रिस्तांचा अनुयायी कुणालाही गुलाम करीत नाही, तो कुणाचा गुलाम देखील होत नाही. मानवी सेवा करणाºयांचे येशू ख्रिस्तांजवळ सर्वात वरचे स्थान आहे. सामाजिक न्याय हा आमच्या विश्वासाचा भाग असला पाहिजे. येशू ख्रिस्तांनी समाजाची पुनर्बांधणी करण्याचे काम केले. जात-धर्म-पंथ-भाषा-वर्ण तसेच वंश यावरून कोणताही भेद येशू ख्रिस्तांना मान्य नव्हता, असे प्रतिपादन दीनबंधू संस्थेचे चेअरमन रेव्हरंट नितीन सरदार यांनी केले.
स्मृती पर्वात आयोजित ‘येशू ख्रिस्त आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनातील सामाजिक न्याय आणि पुनर्बांधणी’ या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. डॉ. अतुल अघमकर अध्यक्षस्थानी होते. यशवंत तायडे, अभिजित परागे, फिलोमन डेव्हीड, संजय गायकवाड, दिलीप दिवसे, अलिशा रामा, जितेंद्र सहारे, गुलशन सिंघानिया, प्रवीण जोसेफ, अनुप न्यूटन, शाहीर मनमोहन राठोड, गिरीश खत्री, समीश नाठार, वंदना भेले, सीमा गजभिये, स्मिता पापडे, संतोष पापडे, अशोक काळे, सुनील मॅसन, संजय माघाडे, राजेश जेकब, भाऊराव वानखेडे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रारंभी पास्टर अनिल कांत आणि रिना कांत यांचा येशू ख्रिस्तांच्या जीवनावरील गीत गायनाचा कार्यक्रम सादर झाला. विषबाधेने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी यावेळी विशेष प्रार्थना करण्यात आली. संस्थेतर्फे या कुटुंबाला सहाय्य करण्यात आले. प्रसंगी स्मृती पर्वाचे समन्वयक ज्ञानेश्वर गोरे, संजय बोरकर, मन्सूर एजाज जोश, शफीउल्ला खाँ, सैयद खलील टेलर्स, सुनीता काळे, प्रा. सविता हजारे, माया गोरे आदींची उपस्थिती होती.